Ram Temple Threat : बॉम्बस्फोट धमकी प्रकरणी एसटीएफकडून दोघांना अटक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, एसटीएफ प्रमुख अमिताभ यश आणि अयोध्येतील राम मंदिरावर बॉम्ब फेकण्याची धमकी देणारा संदेश @iDevendraOffice नावाच्या आयडीवरून आला होता. तपासात असे आढळून आले की, या धमक्या देण्यासाठी [email protected] आणि [email protected] या मेल आयडीचा वापर करण्यात आला होता.

228
Ram Temple Threat : बॉम्बस्फोट धमकी प्रकरणी एसटीएफकडून दोघांना अटक

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाईल. मात्र काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अयोध्येतील राम मंदिर आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याला बॉम्बची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर प्रदेश (Ram Temple Threat) एसटीएफच्या पथकाने या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.

(हेही वाचा – उत्तर प्रदेश एटीएसची महाराष्ट्रातील ISIS शी संबंधित ११ संशयितांच्या घरी छापेमारी; महत्वाच्या गोष्टी केल्या जप्त)

दोन आरोपींना अटक –

उत्तर प्रदेश एसटीएफने बुधवारी (३ जानेवारी) राजधानी लखनौमधील गोमतीनगरच्या विभूती खंड परिसरातून दोन आरोपींना (Ram Temple Threat) अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ताहर सिंग आणि ओमप्रकाश मिश्रा अशी आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले की ते पैरामेडिकल इंस्टीट्यूटमध्ये काम करतात.

(हेही वाचा – INDI Alliance मधून थेट राहुल गांधींच्या उमेदवारीलाच विरोध; लोकसभेच्या आधीच आघाडीत बिघाडी   )

एसटीएफकडून चौकशी सुरु –

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, एसटीएफ प्रमुख अमिताभ यश आणि अयोध्येतील राम मंदिरावर बॉम्ब फेकण्याची धमकी देणारा संदेश @iDevendraOffice नावाच्या आयडीवरून आला होता. तपासात असे आढळून आले की, या धमक्या (Ram Temple Threat) देण्यासाठी [email protected] आणि [email protected] या मेल आयडीचा वापर करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणानंतर, ताहर सिंगने हे ईमेल आयडी तयार केले आणि ओम प्रकाशने धमकीचा संदेश पाठवला. एसटीएफ या प्रकरणाचा तपास करत आहे.

(हेही वाचा – World Braille Day : भेटा ब्रेल लिपी तयार करणार्‍या अद्भुत शिक्षणतज्ञाला…)

आम्ही राममंदिराच्या उत्सवाचे शोकात रुपांतर करू –

धमकीच्या (Ram Temple Threat) मेलमध्ये लिहिले आहे की; “आमचे लोक उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत, आता राम मंदिर होणार नाही, देवेंद्र तिवारी किंवा योगी होणार नाहीत, त्यांना बॉम्बने उडवले जाईल. जे लोक उत्सवाची तयारी करत आहेत, आम्ही त्याचे शोकात रूपांतर करू.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.