Navi Mumbai Fire : पावणे एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला आग ;अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

पावणे एमआयडीसी परिसरातील मेहक केमिकल असे या कंपनी चे नाव आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाlलेली नाही.

233
Navi Mumbai Fire : पावणे एमआयडीसीमधील केमिकल कंपनीला आग ;अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

नवी मुंबईमध्ये पावणे एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीला गुरुवारी (४डिसेंबर) सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. तर आग लागल्याचे कळताच कंपनी मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली. तर काही क्षणातच इतक्या मोठया प्रमाणावर आग लागली की परिसरात आगीचे लोळ पसरले आहेत. तर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंपनीचे मोठं नुकसान झालं आहे. (Navi Mumbai Fire)

(हेही वाचा : Covid – 19: कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे, ‘या’ राज्यांमध्ये लागू केली मास्क सक्ती)

पावणे एमआयडीसी परिसरातील मेहक केमिकल असे या कंपनी चे नाव आहे. प्लॉट नंबर W5 आणि W6 वर असलेल्या या कंपनी मध्ये ही घटना घडली.तर काही क्षणातच आगीचा भडका उडाला आणि एकापाठोपाठ एक असे भीषण स्फोट झाले. तर प्रसंगावधान राखून कंपनी मध्ये काम करणाऱ्या ळीच बाहेर धाव घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तर या ठिकाणी आग लागल्याची माहिती येथील रहिवाश्यांनी अग्निशमन दलाला दिली. तर आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे. तर ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. तर यापूर्वी काही दिवसांपूर्वी तळोजा येथे एका कंपनीत आग लागल्याची घटना घडली होती. (Navi Mumbai Fire)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.