11 Balls, 6 Wickets, 0 Runs : चहापानानंतर भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात असं नेमकं काय घडलं?

आफ्रिकन संघाला ५५ धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाची अवस्था ४ बाद १५३ अशी चांगली होती. पण, तिथून घात झाला

329
11 Balls, 6 Wickets, 0 Runs : चहापानानंतर भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात असं नेमकं काय घडलं?
11 Balls, 6 Wickets, 0 Runs : चहापानानंतर भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात असं नेमकं काय घडलं?

ऋजुता लुकतुके

केपटाऊन कसोटी एकाच दिवशी २३ बळी गेले म्हणून जशी लक्षात राहील, तशीच भारताच्या चहापाना नंतरच्या घसरगुंडीसाठीही दीर्घ काळ स्मरणात राहील. ४ बाद १५३ वरून (11 Balls 6 Wickets 0 Runs) भारतीय संघाचा डाव सर्वबाद झाला. पण, धावसंख्येत एकाही धावेची भर न घालता. आणि ते ही पुढच्या ११ चेंडूंत.

अशी घसरगुंडी क्रिकेटच्या इतिहासात मागच्या १४६ वर्षांत झालेली नाही. चहापानानंतर नेमकं काय झालं ते बघूया…

भारतीय संघाने खरंतर डावाची सुरुवात जोशात केली होती. आणि यशस्वी जयसवाल शून्यावर बाद झाला तरी शुभमन गिल आणि रोहीत शर्मा यांनी भारतीय संघाला आघाडीही आरामात मिळवून दिली. पण, पंधराव्या षटकात संघाच्या ७२ धावा झाल्या असताना आधी रोहीत ३९ धावा करून बाद झाला. आणि त्यानंतर १०५ धावसंख्या असताना शुभमनही फटकेबाजीचा मोह न आवरता आल्याने ३६ धावा करून बाद झाला.

रोहित आणि शुभमनने उसळी घेतलेल्या चेंडूंवर काही पूलचे देखणे फटके मारले. पण, आफ्रिकन गोलंदाजांची चेंडूला उसळी देण्याचीच रणनीती होती. आणि त्यावर श्रेयस अय्यर आणि नंतरचे सर्व फलंदाज चकले.

(हेही  वाचा-SSC HSC Exam 2024 : राज्यभरातील शिक्षण संस्थाचालकांचा दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार ?)

एका बाजूने विराट कोहली फटकेबाजी करत असल्यामुळे निदान संघाने दीडशेचा टप्पा ओलांडला. विराटने राहुलबरोबर ४३ धावांची मोलाची भागिदारीही केली. आणि संघाची धावसंख्या ४ बाद १५३ वर पोहोचली. तिथेच जमवून आणलेलं गणित बिघडलं.

एरवी के एल राहुलने बचावात्मक पवित्रा घेत ३३ चेंडूंत ८ धावा केल्या होत्या. पण, एनगिडीच्या एका उसळी मिळालेल्या चेंडूंच्या मार्गात बॅट मध्ये घालण्याचा मोह त्याला आवरला नाही. आणि तो ३४व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. भारताची अवस्था ५ बाद १५३.

त्याचा पुढचा चेंडू रवी जाडेजाने खेळून काढला. पण, त्यानंतरचा चेंडू पुन्हा उसळला. आणि जाडेजा पॉइंटला मार्को यानसेनकडे झेल देऊन शून्यावर बाद झाला. भारत ६ बाद १५३.

जसप्रीत बुमराह आल्यावर विराटशी फलंदाजीबद्दल बोलला. पुढचा चेंडू त्याने आत्मविश्वासाने खेळून काढला. पण, नंतर मात्र स्लिपमध्ये सरावासाठी झेल द्यावा तसा तो बाद झाला. भारत ७ बाद १५३. लुंगी एनगिडीच्या एका षटकात ३ भारतीय फलंदाज एका चेंडू आड एक बाद झाले.

आता तळाचे फलंदाज आलेले पाहून विराटला सूत्र आपल्या हाती घ्यावी असं वाटलं असणार. त्यामुळे तो प्रत्येक चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत होता. आणि अचानक रबाडाचा एक चेंडू असा आला की, त्याला खेळावाही लागला. चेंडू फक्त त्याच्या बॅटची कड घेऊन दुसऱ्या स्लिपमध्ये विसावला. आता आफ्रिकन संघात एकच जल्लोष झाला. कारण, भारताचा शेवटचा फलंदाज बाद झाला होता. भारत ८ बाद १५३.

सिराज आणि प्रसिध मैदानावर होते. प्रसिधने चेंडू ऑफला दटावला. खरंतर यात धाव नव्हती. पण, तसं तो ओरडून सिराजला सांगू शकला नाही. सिराजने धावेसाठी आपलं क्रीज सोडलं होतं. तो वेळेत परतू शकला नाही. बर्गरने अगदी आरामात धावत येत यष्ट्या उडवल्या. सिराज शून्यावर बाद. भारत ९ बाद १५३.

यापूर्वी कसेबसे दोन चेंडू खेळून काढलेला प्रसिधही त्याच्या पुढच्याच चेंडूवर बाद झाला. भारत सर्वबाद १५३.

क्रिकेटच्या इतिहासात ११ चेंडूंत ६ बळी आणि ते ही शून्यात जाण्याची ही पहिलीच वेळ ठरली. नको तो विक्रम भारताच्या नावावर लागला.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.