ऋजुता लुकतुके
शाओमी आणि विवो (Vivo X100 Series) या दोन मोबाईल फोन कंपन्या एकाच दिवशी म्हणजे ४ जानेवारीला आपले फ्लॅगशिप फोन भारतात लाँच करत आहेत. पैकी रेडमी १३ नोट फोनविषयी आपण आधीच जाणून घेतलं आहे. आता विवो एक्स१०० सीरिज नेमकी काय आहे ते बघूया…
विवो एक्स १०० सीरिज ही डिमेन्सिटी ९३०० असा तगडा चिपसेट वापणारा फोन आहे. मीडियाटेक कंपनीचा हा पहिला मोठा फ्लॅगशिप मोबाईल सीपीयू आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ शी स्पर्धा करणारा हा चिपसेट आहे. फोनचा डिस्प्ले एमोल्ड आणि ६.७ इंचांचा आहे. आणि त्याची प्रखरता ३,००० नीट्सची आहे.
१२ जीबी रॅम आणि ५१२ जीबीचं सगळ्यात जास्त स्टोरेज असलेला हा फोन असेल.
We’re all set to exceed your expectations with the #vivoX100Series.
Get ready to experience the Next level of imaging. Launching today at 12PM.Click the link to know more.https://t.co/p91NpSIEBv#vivoX100Series #NextLevelOfImaging #XtremeImagination pic.twitter.com/j7Oyencnna
— vivo India (@Vivo_India) January 3, 2024
फोनच्या मागच्या बाजूला असलेला कॅमेरा आयलंड देखणा आणि आकर्षक आहे. यात आहे इथं आहे ५० मेगापिक्सलचा सोनी सेन्सर. आणि झाईसची ६४ मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स. बरोबरीने या आयलंडवर आहे ५० मेगा पिक्सलचा अल्ट्रावाईड कॅमेरा.
५००० एमएएच क्षमतेची तगडी बॅटरी या फोनमध्ये असेल. आणि १०० वॅटचं फास्ट चार्जिंगही यात उपलब्ध असेल. अजून या फोनची भारतातील नेमकी किंमत कळलेली नाही. पण, चीनमध्ये हा फोन लाँच झाला तो ४,९९९ युनानला. म्हणजे भारतात हा फोन ६३,९९९ रुपयांपासून सुरू होईल, असा अंदाज आहे. तर प्रो फोनसाठी हीच किंमत ८९,९९९९ रुपयांच्या घरात जाऊ शकते.
Join Our WhatsApp Community