Donation to Ram Mandir : राममंदिराला देणगी देत आहात ? वाचा अधिकृत वेबसाईट कोणती आहे…

Donation to Ram Mandir : राममंदिराविषयी सर्वांच्या भावनेचा दुरुपयोग केला जात आहे. राममंदिरासाठी देणगी गोळा करणाऱ्या कित्येक फेक वेबसाईट्स चालवल्या जात आहेत.

412
Donation to Ram Mandir : राममंदिराला देणगी देत आहात ? वाचा अधिकृत वेबसाईट कोणती आहे...
Donation to Ram Mandir : राममंदिराला देणगी देत आहात ? वाचा अधिकृत वेबसाईट कोणती आहे...

प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर अयोध्यानगरीत (Ayodhya) बनत असल्याने केवळ भारतभरातूनच नाही, तर जगभरातील भाविक यथाशक्ती दान पाठवत आहेत. (Donation to Ram Mandir) 22 जानेवारी रोजी या मंदिरातील नूतन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Rammandir Pran Pratishtha) पार पडणार आहे. जे प्रत्यक्ष अर्पण देऊ शकत नाहीत, ते कित्येक जण ऑनलाईन देणगी (Donate Online) पाठवत आहे.

(हेही वाचा – S Jaishankar : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भेटीनंतर एस जयशंकर यांना युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा फोन)

फेक वेबसाईट्सचा धोका

राममंदिराविषयी (Ram Mandir) सर्वांच्या भावनेचा दुरुपयोग केला जात आहे. राममंदिरासाठी देणगी गोळा करणाऱ्या कित्येक फेक वेबसाईट्स चालवल्या जात आहेत. यामुळे एखाद्या व्यक्तीने भक्तीभावाने दिलेली देणगी या फेक वेबसाईटच्या (Fake website) माध्यमातून थेट स्कॅमर्सच्या अकाउंटमध्ये पोहोचत आहे. त्यामुळेच राम मंदिरासाठी देणगी देताना अधिकृत खात्यावर रक्कम पाठवत आहोत ना, याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

कुठे देता येईल देणगी ?

राममंदिराच्या अधिकृत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला (Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra) भाविक अर्पण करू शकतात. जगभरातील श्रीरामभक्त या ट्रस्टच्या संकेतस्थळाला भेट देऊन आपली देणगी देऊ शकतात. कॅश किंवा ऑनलाईन माध्यमातून हे पैसे देता येतील. (Donation to Ram Mandir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.