PM Narendra Modi : मोदी दक्षिणेतुन लढणार?; भाजप मुख्यालयात चर्चा

२०१४ मध्ये मोदींनी वाराणसीच्या जागेची निवड केली, त्याचा पक्षाला खुपच मोठा फायदा झाला. उत्तर प्रदेशात विक्रमी जागा मिळविण्यात पक्षाला मदत झाली. मोदी आता तामिळनाडूकडे लक्ष देत आहेत. काहीतरी नक्कीच महत्वाचं घडणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

240
PM Narendra Modi शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर; 'या' महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे करणार उद्घाटन

आगामी लोकसभा निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दक्षिण भारतातील एखाद्या राज्यातुन लढवतील अशी, चर्चा भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात जोरात सुरु आहे. २०१४ मध्ये मोदींनी (PM Narendra Modi) वाराणसीच्या जागेची निवड केली, त्याचा पक्षाला खुपच मोठा फायदा झाला. उत्तर प्रदेशात विक्रमी जागा मिळविण्यात पक्षाला मदत झाली. मोदी (PM Narendra Modi) आता तामिळनाडूकडे लक्ष देत आहेत. काहीतरी नक्कीच महत्वाचं घडणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र या निव्वळ अफवा असल्याचे मत एका भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले. कारण मोदी (PM Narendra Modi) दोन जागांवर उभे राहणार नाहीत, असे देखील ज्येष्ठ नेते सांगत आहेत. मात्र दक्षिणेचा किल्ला लढविण्यासाठी मोदी पेक्षा चांगला पर्याय पक्षाला भविष्यात मिळणार नसल्याचे सांगत दक्षिण प्रांत जिंकण्यासाठी ही सुवर्णंसंधी असल्याचे मत पक्षातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – PM Modi Snorkeling : लक्षद्वीपमध्ये पंतप्रधान मोदींनी घेतला ‘स्नॉर्कलिंग’चा अनुभव; फोटो वायरल)

यावेळी इंडी आघाडी एकत्रित उमेदवार देईल

तर दुसरीकडे इंडी आघाडीतील (I.N.D.I. Alliance) मित्रपक्ष मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीतुन एकच उमेदवार उभा करता येईल काय, याचा अंदात घेत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत प्रियंका गांधी वाराणसीतून उभ्या राहतील अशी चर्चा होती. मात्र मोदी यांनी ६० टक्क्यांहून जास्त मते मिळवून ही जागा जिंकली. यावेळी मात्र इंडी आघाडी एकत्रित उमेदवार देईल असे दिसते. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतेच तिरुचिरापल्ली विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटनही केले. रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू, जहाजबांधणी आणि उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित १९ हजार ८५० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटनही केले. (PM Narendra Modi)

एआयएडीएमके (AIADMK) नेत्याने सांगितले की आम्ही पंतप्रधानांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत होतो. ज्यामुळे आम्हाला दिशा मिळू शकेल की, आमचा पक्ष राज्यात काय करेल. खरं तर, सप्टेंबर २०२३ मध्ये AIADMK ने NDA आघाडी सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, तामिळनाडू आणि दिल्लीतील भाजप नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही की भाजप अण्णाद्रमुकला एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल की स्वतःची आघाडी स्थापन करेल. सध्या तामिळनाडूत भाजप ‘एकला चलो’चा मार्ग अवलंबताना दिसत आहे. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.