प्रभू श्रीरामाचा (Shri Ram) अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याही विरोधात प्रभू श्रीरामाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांना श्रीरामाचा अवमान भोवणार; नाशकात गुन्हा दाखल)
पोलिसांनी भादंवि 295-अ अन्वये गुन्हा दाखल केला
जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना श्रीरामाचा (Shri Ram) अवमान केला. त्यांचा अपमानास्पद उल्लेख केला. त्यामुळे नाशिकमधील काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीर दास महाराज यांनी नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आत उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक मुलाखतीत बोलताना श्रीरामाचा अवमान केला, त्यामुळे त्यांच्या विरोधात मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मालेगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते अमन परदेशी यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. सुषमा अंधारे यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना श्रीराम (Shri Ram) आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा परदेशी यांचा दावा आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भादंवि 295-अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संबंधितांचे जबाब नोंदविल्यानंतर सुषमा अंधारे यानांही पोलिस पाचारण करणार आहेत, भारतीय पुरावा कायदा कलम 65 ब अन्वये यूट्यूबवरील क्लिप पुरावा म्हणून ग्राह्य धरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community