मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज २० जानेवारीला मुंबईत येणार आहे, दरम्यान ओबीसी समाजाने देखील २० जानेवारी मुंबईत आंदोलन करणारा आहे. या आंदोलनाला ओबीसी समाजाकडून मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. परंतु मराठा समाजाच्या नेत्यांकडून परवानगीसाठी अद्याप कुठलाही पत्रव्यवहार करण्यात आलेला नसल्याची माहिती मुंबई पोलीस सूत्रांनी दिली आहे. (Maratha-OBC March)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी २० जानेवारी रोजी मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईत आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचवेळी म्हणजे, २० जानेवारी पासून मुंबईत ओबीसी समाजाकडून मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत दोन्ही समाज एकत्र येणार असल्यामुळे मुंबईत तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मुंबई पोलिसांकडून मुंबईत १८ जानेवारी २०२४ पर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलेला असून याची कालावधी पुढील पंधरा दिवसांसाठी वाढवण्याची शक्यता आहे. (Maratha-OBC March)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : शेतकरी महिला भगिनींचे देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासात अमूल्य योगदान)
मुंबई पोलिसांकडे कोणताही अर्ज दाखल झालेला नाही
मुंबईत आंदोलन, मोर्चा, निर्दशने, सभा यासाठी मुंबई पोलिसांची परवानगी महत्वाची असते, त्यासाठी आंदोलन मोर्चे काढणाऱ्यांकडून कार्यक्रमाची दिशा, आंदोलनाचे ठिकाण ही माहिती परवानगी अर्जात द्यावी लागते. सूत्राच्या म्हणण्यानुसार मराठा समाजाच्या नेत्यांकडून अद्याप २० जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी कुठल्याही प्रकारे परवानगीसाठी मुंबई पोलिसांकडे अर्ज दाखल झालेला नाही. मात्र ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून २० जानेवारी रोजी मुंबईत आंदोलनासाठी परवानगी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. एकाचवेळी मुंबईत ओबीसी आणि मराठा समाज आंदोलनासाठी आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिस आणि राज्य सराकर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Maratha-OBC March)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community