मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासंदर्भातील मोर्चा येत्या २० जानेवारी रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा केली जात असली प्रत्यक्षात हे आंदोलन कुठल्या मैदानावर होणार याबाबत कुठेही स्पष्टता नाही. मात्र, दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर अर्थात शिवाजी पार्कवर (Shivaji Park) हा मोर्चा काढला जाईल, असे बोलले जात आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा मोर्चा काढण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे या शिवतिर्थावर मराठा समाजाचा मोर्चा काढण्याचा मार्गच बंद झाल्याने या मोर्चासाठी आता अन्य मैदानांचा शोध घ्यावचा लागणार आहे. (Maratha Reservation)
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबतम मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात येणार असून येत्या २० जानेवारीला हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. त्यामुळे सरकार जोवर ठाम निर्णय घेत नाही तोवर आम्ही तिथून हटणार नाही असा निर्धार जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी केला आहे. त्यामुळे मुंबईत हा मोर्चा आझाद मैदान, क्रॉस मैदान, दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान, बीकेसी आदी मैदानांचा पर्याय ठेवला असून यासर्व मैदानांची पाहणी जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. (Maratha Reservation)
(हेही वाचा – Maratha-OBC March : मराठा आणि ओबीसी समाज आंदोलन; मुंबईत कोणाला मिळणार पोलिसांकडून परवानगी)
शिवतिर्थावर या मोर्चासाठी परवानगीच मिळण्याची शक्यता कमी
परंतु अद्यापही मैदान निश्चित करण्यात आले नसून शिवाजी पार्क मैदानाचा पर्यायही त्यांच्यासमोर असला तरी तांत्रिक कारणामुळे हे मैदान या मोर्चा तथा आंदोलनासाठी देता येणार नाही. शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असून या मैदानावर ४५ दिवस विविध कार्यक्रमांसाठी दिले जातात. त्यामध्ये २६ जानेवारी, १५ ऑगस्ट हे कार्यक्रम निश्चित असून याशिवाय सहा डिसेंबर, १४ एप्रिल तसेच शिवसेना दसरा मेळावा असे कार्यक्रम केले जातात, या व्यतिरिक्त जे दिवस शिल्लक राहतात त्या दिवशी सभा, कार्यक्रम हे राज्य शासनाच्या मंजुरीने परवानगी दिली जाते. परंतु न्यायालयाच्या निर्णयानुसार, शिवाजी पार्कमध्ये कोणत्याही प्रकारच्या मोर्चा तथा आंदोलनासाठी परवानगी देता येत नाही. त्यामुळे जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांना मराठा समाजाचा मोर्चा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) काढता येणार नाही. शिवतिर्थावर या मोर्चासाठी परवानगीच मिळण्याची शक्यता कमी आहे, असे महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Maratha Reservation)
छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचे एकूण क्षेत्रफळ पाहता सुमारे १ लाख लोकांची क्षमता आहे. या मैदानातील खेळपट्ट्या संरक्षित केल्यास मोजक्याच जागेवर लोकांना बसता येऊ शकते, त्यामुळे ही क्षमता कमी होते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, तर आझाद मैदान आणि क्रॉस मैदानावरील लोकांची क्षमता यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी तीन कोटी लोक या मोर्चात सहभागी होती असा दावा केला असला तरी त्यांच्या एक टक्का लोक बसतील एवढीही क्षमता असणारी मैदाने नसल्याने जरांगे हे आता या मोर्चासाठी कुठले मैदान निवडतात याकडेच सर्वांचे लक्ष आहे. (Maratha Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community