मंत्रालयात लिपिक टंकलेखनाचे (Clerk Typists) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय गुरुवारी (०४ जानेवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारप्रमाणे (Central Govt) लिपिक टंकलेखकांना (Clerk Typists) ग्रेड पे लागू करण्याची मंत्रालय कर्मचाऱ्यांची मागणी होती. ही मागणी मान्य करण्याऐवजी सरकारने त्यांना दरमहा पाच हजार रुपय देण्याचा निर्णय घेतला आहे. (Ministry Clerk Typists)
मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरुप लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ११ कोटी ३४ लाख ६० हजार एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. सध्या मंत्रालयातल्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये लिपिक-टंकलेखकांची (Clerk Typists) संख्या १ हजार ८९१ इतकी असून त्यांना याचा लाभ मिळेल. (Ministry Clerk Typists)
(हेही वाचा – Maratha Reservation Survey : कितीही कर्मचारी नेमा पण मराठा सर्वेक्षण आठ दिवसांत पूर्ण करा…)
मंत्रालयामध्ये नव्याने लिपिक-टंकलेखक (Clerk Typists) पदावर रुजू झालेले कर्मचारी हे अपुरी आणि महागडी निवास व्यवस्था, जिकीरीचा प्रवास, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात तसेच जवळच्या उपनगरात भाडे तत्वावर घरे उपलब्ध न होने या कारणांमुळे अल्पावधीत सेवा सोडून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. (Ministry Clerk Typists)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community