वरळीचे (Worli) आमदार आणि उबाठा (UBT) गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची शिवसेनेकडून (Shiv Sena) (शिंदे गट) कोंडी करण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. शिवसेनेने वरळीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईचे पालकमंत्री (Guardian minister) आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी वरळीच्या विकास कामांचा आढावा घ्यायला सुरुवात केली असून येथील कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित विभाग आणि महापालिका अधिकाऱ्याना दिल्या पुढच्या आठवड्यात पुन्हा येणार असल्याचे सांगितले. असे काम आणि पाठपुरावा केला गेला तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना येत्या विधानसभा निवडणुकीसाठी नवीन मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार, अशी चिन्हे आहेत. (Aditya Thackeray)
कामे तातडीने पूर्ण करावीत
वरळी कोळीवाड्यातील रहिवाश्यांच्या सोयीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, मत्स्यव्यवसाय विभाग, बंदरे विभाग, मेरिटाइम बोर्ड आदी यंत्रणांमार्फत विकास कामे सुरू आहेत. ही कामे तातडीने आणि दर्जेदाररित्या पूर्ण करावीत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. (Aditya Thackeray)
पुन्हा भेट देऊन कामांची पाहणी करणार
केसरकर यांनी गुरुवारी वरळी कोळीवाडा (Koliwada) येथे भेट देऊन सुरू असलेल्या विकास कामांची (development work) पाहणी केली. स्थानिक रहिवाशी, मच्छिमार (Fishermen) बांधवांशीही त्यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या तसेच सूचना जाणून घेतल्या. यावेळी नऊपाटील जमात इस्टेट, वरळी कोळीवाडा ओनर्स असोसिएशन (Worli Koliwada Owners Association), गावकरी इस्टेट कमिटी (Gaavkari Estate Committee), अन्य स्थानिक मच्छिमार संस्था आदींच्या प्रतिनिधींनी केसरकर यांच्याशी संवाद साधताना कोळीवाड्यांच्या विकासासंदर्भातील त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. केसरकर यांनी नागरिकांच्या समस्या आणि सूचना जाणून घेऊन त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना उचित कार्यवाहीच्या सूचना केल्या. एका आठवड्यानंतर येथे पुन्हा भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Aditya Thackeray)
(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या विभागीय सहायक आयुक्तांना मिळणार नवीन स्कॉर्पिओ)
विकास कामांचे सादरीकरण
महानगरपालिकेमार्फत यावेळी सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले की, स्थानिकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोल्फादेवीच्या यात्रेपूर्वी तेथील रस्त्याचे काम पूर्ण करावे. कोळी बांधवांच्या खाद्य संस्कृतीचा प्रसार व्हावा याबरोबरच महिला सक्षमीकरणावर शासनाचा भर आहे. त्या अनुषंगाने कोळीवाडा येथे फूड कोर्टचे काम तातडीने सुरू करण्यात यावी. येथील क्लिव्ह लॅण्ड जेटीवर समुद्राच्या लाटांपासून बचाव करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या भिंतीचे काम ७ दिवसात सुरू करा, स्थानिकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठीच्या जागेची दुरूस्ती करून ती वापरण्यायोग्य करा. वरळी किल्ल्याजवळील परिसर सुशोभित करून तेथे नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या, येथील मैदानाचा विकास करून खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. (Aditya Thackeray)
यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्यासह विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Aditya Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community