Hijbul Mujahideen : हिजबुलच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला ठोकल्या बेड्या 

209

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राजधानी दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या (Hijbul Mujahideen) एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या. या दहशतवाद्यावर सरकारने १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. हा दहशतवादी जम्मू काश्मीरमधील अनेक अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी होता. या दहशतवाद्याचे नाव जावेद अहमद मट्टू असे  असून तो हिजबुलचा कमांडर होता.

जावेद मट्टू यापूर्वी अनेकदा पाकिस्तानमध्येदेखील जाऊन आला आहे. तो जम्मू काश्मीरमधल्या सोपोरमधला रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी सोपोरमध्ये त्याच्या भावाने घराबाहेर तिरंगा फडकवला होता. त्याचे फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. जावेद मट्टू हा A++ ग्रेडचा दहशतवादी होता. तसेच तो हिजबुलचा (Hijbul Mujahideen) शेवटचा A++ ग्रेडचा दहतवादी होता. संरक्षण यंत्रणांनी अलीकडच्या काळात हिजबुलच्या अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर काही दहशतवाद्यांच्या अज्ञातांनी हत्या केल्या आहेत. त्यामुळे हिजबुलचे कंबरडे मोडले आहे.

(हेही वाचा Cow Slaughtering : धर्मांध मुसलमानांची विकृती; गाभण गायीची केली हत्या; परिसरात संतापाची लाट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.