रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे शुक्रवारी (५डिसेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित ‘शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी जवळपास ७५ हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या आदेशानुसार मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. (Mumbai-Goa Highway)
मुंबई-गोवा महामार्गा वरुन लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र प्रत्येक महिन्यात होणारा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम यावेळी हा रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाकरिता येणाऱ्या नागरिकांमुळे वाहतूक कोंडीची शक्यता गृहीत धरून तसेच कार्यक्रम सुस्थितीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात येत आहेत.
(हेही वाचा : BMC : महापालिकेच्या विभागीय सहायक आयुक्तांना मिळणार नवीन स्कॉर्पिओ)
काय आहेत बदलेले मार्ग
- ५जानेवारी २०२४ च्या मध्यरात्री १२ पासून रात्री ११ वाजेपर्यंत दूध,डिझेल,स्वयंपाकाचे गॅस, औषधे,ऑक्सीजन,भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळून इतर सर्व जड-अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या कशेडी ते खारेपाडापर्यंत व मुंबई बाजूकडून येणाऱ्या खारपाडा ते कशेडीकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
- त्याचप्रमाणे खोपोली-पालीफाटा ते वाकण या महामार्गावरून गिलावा बाजूकडे येणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत व दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत मुंबईकडे जाणारी वाहने ही मोर्बेमार्गे माणगाव येथे वळविण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community