- ऋजुता लुकतुके
क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात छोट्या कसोटीत विजय मिळवून भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर पोहोचला आहे. (India vs SA 2nd Test)
भारतीय संघाने अखेर दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. केपटाऊनमध्ये भारताचा हा पहिला कसोटी विजय होता. त्याचबरोबर आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही भारतीय संघाने आता गमावलेलं अव्वल पद परत मिळवलं आहे. (India vs SA 2nd Test)
केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जेवणाच्या सुटीनंतर फक्त १२ षटकांत भारतीय संघाने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. आधी भारतीय संघाने आफ्रिकेला पहिल्या डावांत ५५ धावांत गुंडाळलं. त्यानंतर पहिल्या डावात भारताने १५३ धावा करत ९८ धावांची आघाडी मिळवली. आणि पहिल्या दिवसाच्या शेवटी आफ्रिकेचे दुसऱ्या डावातले तीन बळीही मिळवले होते. (India vs SA 2nd Test)
(हेही वाचा – Suryakumar Yadav : २०२३ मध्येही आयसीसी टी-२० पुरस्कारासाठी सुर्यकुमारचंच पारडं जड)
एवढ्या घडामोडी एका दिवसांत घडल्या. त्यानंतर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, भारताने आफ्रिकेचे उर्वरित ७ गडी ११४ धावांत बाद केले. आणि भारतासमोर विजयासाठी ७९ धावांचं आव्हान होतं. हे आव्हान ३ गडी गमावत भारतीय संघाने पार केलं. आणि केपटाऊन कसोटी जिंकली. या विजयामुळे १२ गुण मिळवत भारतीय संघ आयसीसी क्रमवारीतही पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. (India vs SA 2nd Test)
India move to the top 📈
More ➡️ https://t.co/2juF4qgC6D pic.twitter.com/bFSICZUXux
— ICC (@ICC) January 5, 2024
भारतासाठी दक्षिण आफ्रिकेतील ही कसोटी मालिका मोठ्या चढ उतारांची ठरली आहे. सेंच्युरियन कसोटीत भारताचा तीन दिवसांच्या आत १ डाव आणि ३१ धावांनी पराभव झाला. त्यामुळे आयसीसी क्रमवारीत भारताची पहिल्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानावर घसरण झाली होती. (India vs SA 2nd Test)
(हेही वाचा – Arvind Kejriwal : एकीकडे ईडीच्या रडारवर तर दुरीकडे गुजरातचा दौरा ; नेमकं चाललंय काय?)
आणि तोच भारतीय संघ केपटाऊनमध्ये निर्विवाद विजय मिळवून पुन्हा क्रमवारीतील शिडी वर चढला आहे. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ ५० टक्के गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताच्या खात्यात दोन कसोटी विजय, १ पराभव आणि १ अनिर्णित राहिलेली कसोटी अशी कामगिरी आहे. आणि त्या जोरावर भारताची टक्केवारी ५४ टक्क्यांची आहे. (India vs SA 2nd Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community