ED Raids : काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार आणि दिलबाग सिंग यांच्या घरावर ईडीचे छापे

आयएनएलडीचे माजी आमदार दिलबाग सिंग यांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकले आहेत. येथून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त करण्यात आली. बेकायदेशीर खाणकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

205
ED Raids : काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार आणि दिलबाग सिंग यांच्या घरावर ईडीचे छापे

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) (ED Raids) हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील कथित बेकायदेशीर खाणकामासंदर्भात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार सुरेंद्र पवार आणि आयएनएलडीचे माजी आमदार दिलबाग सिंग यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले.

यावेळी दिलबाग सिंगच्या घरातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – DCM Ajit Pawar : आगामी १०० वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा; विकास कामाच्या आढावा बैठकीत अजित पवारांच्या सूचना)

चार ते पाच किलो सोने जप्त –

ईडीच्या सूत्रांनी (ED Raids) दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर परदेशी बनावटीची शस्त्रे, ३०० पुडक्यांमधील बेकायदेशीर वस्तू, १०० हून अधिक दारूच्या बाटल्या, ५ कोटी रुपये रोख आणि सुमारे चार ते पाच किलो सोने जप्त करण्यात आले. दिलबाग सिंगच्या घरातून मोठ्या प्रमाणात मालमत्तेची कागदपत्रेही सापडली आहेत.

(हेही वाचा – China Praise Narendra Modi : चिनी ड्रॅगन नरमला; केली पंतप्रधान मोदी यांच्या कारकीर्दीची प्रशंसा)

बेकायदेशीर खाणकामाद्वारे मोठ्या प्रमाणात सोने, चांदीची तस्करी

ईडीच्या अधिकाऱ्यांनी (ED Raids) सांगितले की, हे संपूर्ण प्रकरण अवैध खाणकामशी संबंधित आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार (पीएमएलए) यमुनानगर, सोनीपत, मोहाली, फरिदाबाद, चंदीगड आणि कर्नाल येथील दोन्ही नेत्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या २० ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. यमुनानगर आणि लगतच्या जिल्ह्यांमधील कथित अवैध खाणींच्या तपासासाठी हरियाणा पोलिसांनी गेल्या काही दिवसांत अनेक एफआयआर नोंदवल्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचे हे प्रकरण समोर आले आहे. बेकायदेशीर खाणकामाद्वारे मोठ्या प्रमाणात सोने, चांदी आणि इतर धातू लपवून त्यांची तस्करी केली जात असल्याचा आरोप आहे, त्यानंतर ईडीने (ED Raids) छापे टाकले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.