Jio Financial in MF : जिओ आता लाँच करणार स्वत:चे म्युच्युअल फंड

रिलायन्सची जिओ फायनान्शिअल ही कंपनी ब्लॅकरॉक कंपनीच्या सहकार्याने म्युच्युअल फंड व्यवसायात पदार्पण करणार आहे. 

325
Jio Financial in MF : जिओ आता लाँच करणार स्वत:चे म्युच्युअल फंड
Jio Financial in MF : जिओ आता लाँच करणार स्वत:चे म्युच्युअल फंड
  • ऋजुता लुकतुके

रिलायन्सची जिओ फायनान्शिअल ही कंपनी ब्लॅकरॉक कंपनीच्या सहकार्याने म्युच्युअल फंड व्यवसायात पदार्पण करणार आहे. (Jio Financial in MF)

भारतात आता लवकरच जिओ म्युच्युअल फंड (Jio Mutual Fund) योजना गुंतवणूकदारांना पहायला मिळू शकतात. कारण, रिलायन्स समुहाची कंपनी असलेली जिओ फायनान्शिअल्सने ब्लॅकरॉक या असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सहकार्याने म्युच्युअल फंड योजना बाजारात आणण्यासाठी आवश्यक परवाना सेबीकडे मागितला आहे. तो मिळाला की, नवीन म्युच्युअल फंडांबरोबरच म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ सांभाळणारी कंपनी म्हणूनही जिओ फायनान्शिल काम करेल. (Jio Financial in MF)

जुलै २०२३ मध्येच रिलायन्सने अमेरिकन असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉकबरोबर एक संयुक्त कंपनी स्थापन करत असल्याची माहिती पहिल्यांदा दिली होती. आता सेबीने (SEBI) उघड केलेल्या माहितीनुसार, जिओनं १९ ऑक्टोबर २०२३ रोजी म्युच्युअल फंड परवान्यासाठी सेबीकडे अर्ज केलेला आहे. आणि त्याचं स्टेटस, ‘प्रक्रिया सुरू’ असं आहे. (Jio Financial in MF)

(हेही वाचा – David Warner Baggy Green : डेव्हिड वॉर्नरची बॅगी ग्रिन कॅप कशी मिळाली?)

१५० दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक

सेबीकडून दर तिमाहीच्या शेवटी अर्ज करणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात येते. जिओ (Jio) आणि ब्लऐकरॉक या कंपन्यांचं ५०-५० टक्के भांडवल नवीन कंपनीत असेल. आणि सुरुवातीला दोन कंपन्या मिळून १५० दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक या कंपनीत करतील, असं बोललं जात आहे. (Jio Financial in MF)

भारतातील असेट मॅनेजमेंट कंपन्यांचा व्यवसाय देशात विस्तारत चालला आहे. आणि नोव्हेंबर २०२३ पर्यंत या कंपन्यांकडे भारतीय गुंतवणुकदारांकडून ४८ लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी आले, असं आकडेवारी सांगते. सेबीची (SEBI) परवानगी मिळाली आणि ही संयुक्त कंपनी ठरल्याप्रमाणे उभी राहिली तर ब्लॅकरॉक कंपनी (BlackRock Company) भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदा प्रवेश करेल. यापूर्वी डीएसपी बँकेबरोबर त्यांनी भागिदारी केली होती. पण, पाच वर्षांपूर्वी डीएसपीबरोबर असलेली ४० टक्के हिस्सेदारी त्यांनी विकूनही टाकली होती. (Jio Financial in MF)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.