कथित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून (Rohit Pawar) बारामती अॅग्रो आणि संबंधित संस्थांच्या परिसरात शुक्रवार ५ डिसेंबर रोजी छापे टाकण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. बारामतीसह या सहा ठिकाणांमध्ये अमरावती, औरंगाबाद,आणि पुणे यांचा समावेश आहे. त्यामुळे आता रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचा – ED Raids : काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार आणि दिलबाग सिंग यांच्या घरावर ईडीचे छापे)
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) ऑगस्ट २०१९ च्या एफआयआरमधून मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण समोर आले. त्या वर्षी २२ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सहकारी क्षेत्रातील साखर कारखाने कथित फसव्या मार्गाने विकल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर आणि ते कमी किंमतीत विकले गेल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर ही पोलिस तक्रार करण्यात आली. (Rohit Pawar)
महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे – रोहित पवार
या सर्व प्रकारानंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी X या प्लॅटफॉर्म वरून ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की; “हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा.ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल…”
हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या #महाराष्ट्र_धर्म जपला आणि वाढवला…
अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने… pic.twitter.com/eBMxFe9Sj4— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 5, 2024
(हेही वाचा – MLA Sunil Kamble : भाजपच्या नेत्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला कानशिलात लगावली; नेमके काय आहे कारण जाणून घ्या)
रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कंपनीवर ईडीची धाड पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. पोहित पवार यांना गेल्यावर्षी बारामती अॅग्रो कंपनीतील कथित गैरव्यावहार प्रकरणी नोटीस मिळाली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी दोन मोठ्या नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यांच्या सांगण्यावरुन माझ्या कंपनीत छापेमारी झाल्याचं ते बोलले होते. (Rohit Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community