Ship hijacked near Somalia : सोमालिया जवळ ‘एमव्ही लीला नॉरफोक जहाज हायजॅक; १५ भारतीयांचा समावेश

सोमालिया जवळ एक जहाज हायजॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . महत्वाची बाब म्हणजे या जहाजामध्ये १५ भारतीय क्रु मेंबर देखील आहेत .

221
Ship hijacked near Somalia : सोमालिया जवळ 'एमव्ही लीला नॉरफोक जहाज हायजॅक; १५ भारतीयांचा समावेश

सोमालियाच्या (Somalia) किनाऱ्याजवळ गुरुवारी (४ जानेवारी) संध्याकाळी अपहरण झाल्याची घटना घडली. व्यापारी जहाजाच्या सभोवतालच्या परिस्थितीवर भारतीय नौदल बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे लष्करी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (५ जानेवारी) सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,’एमव्ही लीला नॉरफोक’ (MV Leela Norfolk) असे या जहाजाचे नाव आहे. या जहाजावर 15 भारतीय क्रु मेंबरसचा समावेश आहे. (Ship hijacked near Somalia)

हायजॅक झाल्याची माहिती मिळताच भारतीय नौदलाने (Indian Navy)याची गंभीर दखल घेतली. परिस्थिती हाताळण्यासाठी भारतीय युद्धनौका आय. एन. एस. चेन्नई अपहरण झालेल्या जहाजाच्या दिशेने जात आहे, असे नौदलाने सांगितले.

(हेही वाचा  : Ministry of External Affairs : कतारमधील आठ माजी नौसैनिकांच्या शिक्षेविरोधात भारत करणार याचिका)

भारतीय नौदल या जहाजाकडे लक्ष ठेवून आहे

तर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अपहरण झालेल्या जहाजाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदलाची विमाने तैनात केली आहेत. जहाजाशी यशस्वीरित्या संवाद स्थापित करण्यात आला आहे, ज्यामुळे जहाजावरील कर्मचाऱ्यांची परिस्थिती आणि सुरक्षिततेची माहिती मिळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण दुवा उपलब्ध झाला आहे. भारतीय नौदलाने एका निवेदनात म्हटले आहे की, जहाजाने यूकेएमटीओ (युनायटेड किंगडम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स) पोर्टलवर एक संदेश पाठवला होता, ज्यामध्ये 4 जानेवारी 2024 च्या संध्याकाळी सुमारे पाच ते सहा अज्ञात सशस्त्र जवानांनी जहाजावर चढण्याचे संकेत दिले होते.सोमालियाच्या किनाऱ्याजवळ अपहरण झाल्यानंतर या जहाजावर लायबेरियाचा झेंडा लावण्यात आला आहे. भारतीय नौदल या जहाजाकडे लक्ष ठेवून आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.