राम (Shri Ram) हा आमचा आहे, बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. १४ वर्षे वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाचा (Shri Ram) अवमान केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाडांना चांगलेच सुनावले.
काय म्हणाले छगन भुजबळ?
‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ ही म्हण आपण ऐकली आहे. शरद पवार यांचा जो उरला सुरला गट आहे. तो पक्ष संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही. शरद पवार यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा. शरद पवार यांनी आशीर्वाद दिले तर सोन्याहून पिवळेच आहे. या आधी जितेंद्र आव्हाडांना शरद पवार गटातील नेत्यांनीही जितेंद्र आव्हाडांना सुनावले. त्यामध्ये आमदार एकनाथ खडसे, अनिल देशमुख आणि आमदार रोहित पवार यांचा समावेश आहे. त्यांनी जितेंद्र आव्हाडांना वादग्रस्त विधाने न करण्यास सांगितले.
Join Our WhatsApp Community