Catering Expenses : शासकीय बंगल्यांच्या खानपानाच्या खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे

Catering Expenses : वर्षा आणि सागर या सरकारी बंगल्यांवर मान्यवर अतिथींच्या खानपान सेवांसाठी पुरवठादार निश्चित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासाठीही कंत्राट देण्यात आले आहे.

217
Catering Expenses : शासकीय बंगल्यांच्या खानपानाच्या खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे
Catering Expenses : शासकीय बंगल्यांच्या खानपानाच्या खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारी बंगल्यावर खर्च करण्यात येणाऱ्या खानपानाच्या पैशांबाबत माहिती समोर आली आहे. (Catering Expenses)

अजित पवार यांच्या निवासस्थानासाठीही कंत्राट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे शासकीय निवासस्थान असलेला वर्षा (Varsha) बंगला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सागर (Sagar) हे सरकारी निवासस्थान येथे येणाऱ्या लोकांच्या खानपान सेवांसाठी वर्षभरात कोटींच्या घरात खर्च होत असल्याचे उघड झाले आहे. वर्षा आणि सागर या सरकारी बंगल्यांवर मान्यवर अतिथींच्या खानपान सेवांसाठी पुरवठादार निश्चित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानासाठीही कंत्राट देण्यात आले आहे.

(हेही वाचा – Attack on ED Team : पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर प्राणघातक हल्ला)

एकूण खर्च साडेसहा कोटी रुपये

राज्य सरकारने एप्रिल 2025 पर्यंत देवगिरी (Devgiri) या अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानासाठी छत्रधारी केटरर्सची नियुक्ती केली आहे. हा करार वार्षिक दीड कोटी रुपयांचा आहे. यासोबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बंगल्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंगल्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यांवर होणारा एकूण खानपानाचा खर्च साडेसहा कोटी रुपये होणार आहे.

मंत्रालय आणि सरकारी निवासस्थानांवर गर्दी

काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ येथील पाहुणचारावर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याची टीका विरोधकांकडून केली आहे. राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर मंत्रालय आणि सरकारी निवासस्थानांवर गर्दी होत होती. याचा सरकारी तिजोरीवर परिणाम होत असल्याचे म्हटलं जात होतं. आरटीआयच्या माहितीनुसार, सरकार स्थापन झाल्यापासूनच्या चार महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केटरिंग सेवेवर 2 कोटी 38 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आलं होतं.

(हेही वाचा – Shri Ram : श्रीरामाचा अवमान केल्याप्रकरणी छगन भुजबळांची आव्हाडांवर टीका, म्हणाले…)

विशेष म्हणजे अजित पवार यांनीच विरोधी पक्षात असतांना मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर ४ महिन्यात खानपानावर तब्बल 2.68 कोटी रुपये खर्च झाल्याविषयी टीका केली होती. (Catering Expenses)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.