सायन चुनाभट्टी येथे २४ डिसेंबर रोजी गुंड सुमित येरुणकर (Sumit Yerunkar) (३८) याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी अरिहंत या ग्रुपचे बांधकाम विकासक विमल जैन याला अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणात कळंबोली येथील एका ज्वेलर्ससह १२ जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात बांधकाम व्यवसायिकांच्या अटकेनंतर अटकेची संख्या १३ झाली आहे. गुंड सुमित येरुणकर (Sumit Yerunkar) याची हत्या टोळीतील अंतर्गत वैमनस्यातून करण्यात आली असल्याचा निष्कर्ष सुरुवातीला पोलिसांकडून काढण्यात आला होता. परंतु ही हत्या सूडबुद्धीने करण्यात आल्याचे बांधकाम व्यवसायिक विमल जैन (Vimal Jain) याच्या अटकेतून समोर आले आहे. (Chunabhatti Firing Case)
२०१६ मध्ये विमल जैन (Vimal Jain) याच्या कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतर सुमित येरुणकर (Sumit Yerunkar) याची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली होती, या गोळीबारात विमल जैनचा भाऊ जिग्नेश जैन हा जखमी झाला होता. विमलने मुख्य शूटर सनील पाटील उर्फ सनी (३७) याच्यासोबत सुमितच्या (Sumit Yerunkar) हत्येची योजना आखली होती, या हत्येसाठी विमल याने संपूर्णपणे आर्थिक मदतही केली होती, असा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चुनाभट्टी (Chunabhatti) येथे झालेल्या सुमित (Sumit Yerunkar) याच्या हल्लेखोरांना अटक केल्यानंतर आरोपींच्या मोबाईल फोन कॉल डिटेल अहवाल (सीडीआर)चे विश्लेषणा दरम्यान, असे आढळून आले की, विमल हा सतत हल्लेखोरांच्या संपर्कात होता, विशेषतः विमल हा या टोळीचा म्होरक्या सनिल पाटील यांच्या संपर्कात होता. चुनाभट्टी पोलीस ठाण्यातील (Chunabhatti Police Station) एका अधिकाऱ्याने सांगितले. “हत्येपासून विमलने स्वतःचा मोबाईल फोन बंद केला होता. विमल जैन (Vimal Jain) याला त्याचा जबाब घेण्यासाठी आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. चौकशी दरम्यान तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही, त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावरील संशय आणखी वाढला, त्यानंतर पोलिसांना त्याच्याविरुद्ध पुरावे सापडले आणि त्याला गुरुवारी अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली. (Chunabhatti Firing Case)
(हेही वाचा – ‘Vedat Marathe Veer Daudle Saat’ शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार)
काय घडले त्या दिवशी…
२४ डिसेंबर रोजी सुमित येरुणकर (Sumit Yerunkar), त्याचे सहकारी रोशन लोखंडे आणि आकाश खंडागळे आणि इतर दोघे असे एकूण पाच जण चुनाभट्टी (Chunabhatti) येथील आझाद गल्ली येथे असलेल्या फोटो स्टुडियो मध्ये गेले होते. २ जानेवारी रोजी सुमितचा वाढदिवस असल्यामुळे शुभेच्छा बॅनरसाठी सुमित हा स्टुडियोमध्ये फोटो काढत असताना दुपारी ३ च्या सुमारास चार हल्लेखोर हातात देशी पिस्तुल घेऊन आले व त्यांनी बाहेरूनच अंधाधुंद गोळीबार करत स्टुडियोमध्ये घुसून सुमितवर गोळ्या झाडून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात सुमित याचा मृत्यू झाला तर एक आठ वर्षाची मुलगी आणि सुमितचे तीन सहकारी जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर चुनाभट्टी पोलिसानी ८ तासांत सनील उर्फ सनी पाटील सह चार हल्लेखोरांना अटक करण्यात आली होती. (Chunabhatti Firing Case)
अटकसत्र…
हल्ल्याच्या काही दिवसांनी कळंबोली येथील ज्वेलर्स संनिध्या देसाई यांना अटक केली होती, ज्याने सनीलला गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे आणि दोन दुचाकी खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते आणि गोळीबार करणाऱ्यांना आश्रय दिला होता आणि प्रभाकर पचिंद्रे याला अटक केली होती. गेल्या आठवड्यात नचिकेत गावंड, प्रशांत रोटकर आणि प्रज्योत माने यांना खुनाला मदत केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि बुधवारी अभिषेक चाळके, विघ्नेश कांबळे आणि रणजित यादव यांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली होती. गुरुवारी अरीहंत ग्रुपचे विकासक विमल जैनला अटक करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्याची संख्या १३ झाली आहे. (Chunabhatti Firing Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community