देशासह जगभरात सध्या २२ जानेवारी रोजी उत्सवी वातावरण असणार आहे. या दिवशी मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या आधीच देशात राजकारण होताना दिसत आहे. निमंत्रणावरुन रुसवे फुगवे दिसून येत आहेत. अशा वेळी मनसेने मात्र लक्ष वेधून घेणारी मागणी केली आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या (Shri Ram Mandir) धामधुमीत ज्या आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मोठे होते. त्यांचा सन्मान होईल अशी मागणी केवळ मनसेने केली आहे. 90 च्या दशकात राम मंदिर आंदोलनाचा मुद्दा तापला होता. त्यावेळी बाळासाहेबांनीच ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा राजकीय मंचावरुन दिली होती. बाळासाहेबांनी सर्व आंदोलक, कार सेवकांचे समर्थन केले होते. राम मंदिर (Shri Ram Mandir) अयोध्येतच होणार, हा मुद्दा प्रखरपणे मांडला होता. आता त्याच बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये आहेत. भाजपाची साथ सोडून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला हात दिला आहे. त्यामुळे मनसेने केलेल्या मागणीचे कौतुक होत आहे.
(हेही वाचा Halal : उत्तर प्रदेशच्या हलाल उत्पादनावरील बंदीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान)
मनसेने काय मागणी केली?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांच्या पक्षाने ही मागणी केली. मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. मनसेचे उपाधक्ष सतीश नारकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अयोध्येतील प्रमुख चौकाला देण्याची मागणी केली. 22 जानेवारीला श्रीरामांची अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना आहे. 23 जानेवरीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे, त्यांचे नाव देऊन त्यांचा उचित सन्मान करण्याची मनसेची मागणी आहे.
Join Our WhatsApp Community