Fake SBI Branch : आता बॅंकही डुप्लीकेट; तमिळनाडूमध्ये उघडकीस आले धक्कादायक कृत्य

Fake SBI Branch : तमिळनाडू येथे तिघांनी मिळून भारतीय स्टेट बँकेचीच बनावट शाखा उघडली आहे. ३ महिने या शाखेच्या माध्यमातून लोकांची फसवणूक चालू होती. खऱ्या शाखेच्या शाखा व्यवस्थापकाकडे याची तक्रार आल्यानंतर एसबीआयच्या बनावट शाखेचे बिंग फुटले आहे.

514
SBI Debit Card Charges: एसबीआय डेबिट कार्डच्या शुल्कात ७५ रुपयांची वाढ, ग्राहकांकडून आकारलेल्या विविध शुल्कांची यादी; वाचा सविस्तर
SBI Debit Card Charges: एसबीआय डेबिट कार्डच्या शुल्कात ७५ रुपयांची वाढ, ग्राहकांकडून आकारलेल्या विविध शुल्कांची यादी; वाचा सविस्तर

आतापर्यंत सायबर फ्रॉडच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाली आहे. (Fake SBI Branch) आतापर्यंत फेक फोनचाच धोका समोर आला होता. आता चक्क बॅंकच फेक उघडल्याचे उघडकीस आले आहे. तमिळनाडू (Tamil Nadu) येथे तिघांनी मिळून भारतीय स्टेट बँकेचीच (State Bank of India) बनावट शाखा उघडली आहे. ३ महिने या शाखेच्या माध्यमातून लोकांची फसवणूक चालू होती.

(हेही वाचा – Catering Expenses : शासकीय बंगल्यांच्या खानपानाच्या खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे)

शाखा व्यवस्थापकाने केली शहानिशा

तमिळनाडूतील पनुर्तीमध्ये एसबीआयच्याच २ शाखा आधीपासूनच आहेत. असे असूनही या तिघांनी मिळून तिसरी शाखा उघडली आहे. याविषयी एका ग्राहकाने तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. खऱ्या शाखेच्या शाखा व्यवस्थापकाकडे याची तक्रार आल्यानंतर एसबीआयच्या बनावट शाखेचे बिंग फुटले आहे.

आरोपी माजी बँक कर्मचाऱ्याचा मुलगा

नव्या शाखेबाबत ऐकून एसबीआयचे (SBI) विभागीय अधिकारीसुद्धा अवाक् झाले. त्यानंतर कारवाईची पुढील सूत्रे हलली. या प्रकरणी पनुर्ती (Panruti) येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्वांत धक्कादायक म्हणजे या तिघांपैकी १ आरोपी हा माजी बँक कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.

(हेही वाचा – Halal : उत्तर प्रदेशच्या हलाल उत्पादनावरील बंदीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान)

पोलिसांनी दिली माहिती

या संपूर्ण कटकारस्थानामागचा मास्टरमाईंड कमल बाबू (Kamal Babu) हा होता. कमल बाबूचे आई-वडील माजी बँक कर्मचारी आहेत. त्याच्या वडिलांचा दहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. तर त्याची आई दोन वर्षांपूर्वी एका बँकेतून निवृत्त झाली होती. या प्रकरणातील दुसरा आरोपी हा पनुर्ती (Panruti) येथे एक प्रिटिंग प्रेस चालवतो. तर तिसरा आरोपी रबर स्टँप तयार करण्याचा व्यवसाय करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Fake SBI Branch)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.