T20 World Cup 2024 चे वेळापत्रक जाहीर; भारत आणि पाकिस्तान एकाच गटात

435
जूनमध्ये होणाऱ्या T20 World Cup 2024 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतील एकूण 9 मैदानांवर 2024 च्या T20 विश्वचषकातील एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. T20 विश्वचषक 2024 चा सलामीचा सामना 1 जून रोजी यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 26 आणि 27 जून रोजी होणार आहेत. 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे.

विश्वचषकाचा गट असा असेल

  • अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
  • ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
  • क गट- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
  • ड गट- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ
आगामी T20 World Cup 2024 विश्वचषक मागील T20 विश्वचषकापेक्षा खूपच वेगळा असेल आणि त्यात पात्रता फेरी खेळली जाणार नाही किंवा सुपर-12 टप्पाही होणार नाही. गेल्या T20 विश्वचषकात एकूण 16 संघांनी भाग घेतला होता, त्यापैकी 8 संघांना सुपर-12 टप्प्यासाठी थेट प्रवेश मिळाला होता. पात्रता फेरीतून चार संघांनी सुपर-12 मध्ये प्रवेश केला होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.