राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे, राज्यातील दिवसागणिक रुग्ण संख्या ६०-६५ हजार झाली, त्यामुळे आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली. म्हणून अखेर राज्य सरकारने १ मेपर्यंत लॉकडाऊन लावला, मात्र अजूनही परिस्थिती नियंत्रणात नाही, त्यामुळे राज्य सरकारने हा लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय गुरुवारी, २९ एप्रिल रोजी घेतला.
‘हिंदुस्थान पोस्ट’ने दिलेले पहिले वृत्त!
राज्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने, ठाकरे सरकारने २२ एप्रिल रात्री ८ पासून १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. ब्रेक दि चेन म्हणत ठाकरे सरकारने या काळात कोरोना साखळी तोडण्यावर देखील भर दिला आहे. १ मे पर्यंतचा लॉकडाऊन संपायला आता अवघे २ दिवस उरले असताना १ मे नंतर राज्यात काय परिस्थिती असेल, लॉकडाऊन उठेल का? की आणखी लॉकडाऊन वाढेल, असे एक ना अनेक प्रश्न सर्वांच्या मनात होते, त्यावेळी ‘हिंदुस्थान पोस्ट’ ने हा लॉकडाऊन वाढवण्यात येईल, अशी पहिली बातमी दिली होती. त्याप्रमाणे सरकारने हा लॉकडाऊन १५ दिवसांसाठी वाढवल्याने ‘हिंदुस्थान पोस्ट’चे वृत्त खरे ठरले आहे.
(हेही वाचा : राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढणार?)
म्हणून लॉकडाऊन वाढला!
१ मे नंतर लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढवावा, असे मत टास्क फोर्सच्या काही अधिकाऱ्यांनी मांडले होते. मात्र १४ मे रोजी रमजान ईद असल्याने या काळात गर्दी होऊ शकते. त्याचमुळे रमजान ईद झाल्यानंतरच लॉकडाऊन उठवायचे असा एक सूर होता. काही मंत्र्यांचे देखील तेच मत होते. रमजान ईद म्हटले की, मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव खरेदीसाठी बाहेर पडत असतात. त्याचमुळे रमजान ईदच्या आधी राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली, तर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होऊ शकते. त्यामुळे आटोक्यात आलेली रुग्ण संख्या वाढू शकेल, अशी भीती देखील सरकारला वाटत होती. याचमुळे १ मे नंतर आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय या महिन्याच्या शेवटी सरकारने घेतला
लॉकडाऊन वाढण्याचे हेही आहे आणखी कारण!
एप्रिल-मे महिना म्हटले की, लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यातच एप्रिल महिन्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने अनेक लग्न सोहळे रद्द झाले आहेत. मात्र आता मे महिन्यात जर निर्बंध शिथिल केले, तर पुन्हा एकदा लग्न समारंभांमध्ये देखील गर्दी होईल. त्यामुळे किमान १५ मे पर्यंत तरी आता जे नियम आहेत तेच कायम ठेवून, लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यावर सरकारचा भर आहे.
Join Our WhatsApp Community