Indian Navy : समुद्री चाच्यांच्या तावडीतून १५ भारतीयांची सखरूप सुटका;मार्कोस कमांडोंची भरीव कामगिरी

सोमलियाच्या किनाऱ्याजवळ गुरुवारी (४डिसेंबर) संध्याकाळी 'एमव्ही लीला नॉरफोक या अपहरण करण्यात आलेल्या जहाजाची सुटका करण्यात भारतीय नौदलाला यश मिळाले आहे.

501
Indian Navy : समुद्री चाच्यांच्या तावडीतून १५ भारतीयांची सखरूप सुटका;मार्कोस कमांडोंची भरीव कामगिरी

भारतीय नौदलाने(Indian Navy) अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सोमलियाच्या किनाऱ्याजवळ गुरुवारी (४डिसेंबर) संध्याकाळी ‘एमव्ही लीला नॉरफोक (MV Leela Norfolk ship) या अपहरण करण्यात आलेल्या जहाजाची सुटका करण्यात भारतीय नौदलाला यश मिळाले आहे. या जहाजावर एकूण २१ क्रू कर्मचारी होते. त्यामध्ये १५ भारतीयांचा समावेश होता. भारतीय नौदलाच्या कमांडोंनी समुद्री चाच्यांना पळवून लावले आहे. नौदलाच्या मार्कोस कमांडोनी ही कारवाई केली. (Indian Navy)

संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय नौदलाचे ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी या अरबी समुद्रात समुद्री चाचेंविरोधात कारवाई करण्याचे निर्देश भारतीय युद्धनौकांना दिले होते. त्याअनुषंगाने या भागात व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी अरबी समुद्रात भारतीय नौदलाने चार युद्ध नौका तैनात केल्या आहेत.नौदलाच्या कमांडोनी जहाजावर सर्च ऑपेरेशन केले त्यानंतर आता जहाजावर अपहरणकर्ते नसल्याची माहिती त्यांनी दिली.(Indian Navy 🙂

(हेही वाचा : T20 World Cup 2024 : भारत – पाक सामना ९ जूनला न्यूयॉर्कमध्ये, फायनल २९ जूनला

‘Predator MQ9B ड्रोन’ तैनात केले होते
भारतीय युद्धनौका आय. एन. एस. चेन्नई अपहरण झालेल्या जहाजाच्या ठिकाणी पोहोचली आणि नौदलाच्या सैन्यांनी या सर्व अपहरणकर्त्यांचा खात्मा केला. तसेच या जहाजाचा शोध घेण्यासाठी शोध घेण्यासाठी सागरी गस्त विमान P-8I आणि लांब पल्ल्याच्या ‘Predator MQ9B ड्रोन’ तैनात केले होते.

मार्कोस कमांडोंनी पार पाडली मोहीम
मार्कोस कमांडो हे समुद्र चाच्यांवर तसेच दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिले होते. मार्कोस हे भारतीय नौदलाचे स्पेशल ट्रेन कमांडोज आहेत. त्यांना या अशा मिशनसाठीच प्रशिक्षित केले जाते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.