Kapil Dev : भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन कपिल देव

कपिल देव यांचे पूर्ण नाव कपिल देव निखंज असे आहे. त्यांचा जन्म पंजाबी हिंदू कुटुंबात ६ जानेवारी १९५९ रोजी चंदीगडमध्ये झाला. कपिल देव यांनी नोव्हेंबर १९७५ मध्ये हरियाणासाठी खेळत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

314
Kapil Dev : भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन कपिल देव
Kapil Dev : भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन कपिल देव

२०२३ चा वर्ल्ड कप आपल्या हातून हुकला. जवळजवळ सगळे सामने जिंकून आपण अंतिम सामन्यात हरलो. मात्र आता भारत वर्ल्ड कप जिंकू शकतो हा विश्वास आपल्याला कपिल देव यांनी दिला. कपिल देव (Kapil Dev) हे ऑलराऊंडर होते. बॅटिंग करताना हिटर होते. विशेष म्हणजे त्यांनी ४०० पेक्षा जास्त विकेट्स काढल्या आहेत.

कपिल देव (Kapil Dev) यांचे पूर्ण नाव कपिल देव (Kapil Dev) निखंज असे आहे. त्यांचा जन्म पंजाबी हिंदू कुटुंबात ६ जानेवारी १९५९ रोजी चंदीगडमध्ये झाला. कपिल देव (Kapil Dev) यांनी नोव्हेंबर १९७५ मध्ये हरियाणासाठी खेळत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी पंजाबविरुद्ध ६ विकेट्स काढल्या आणि आणि पंजाबला केवळ ६३ धावांवर रोखले आणि हरियाणाला विजय मिळवून दिला. त्यांनी ३० सामन्यांत १२१ विकेट्स घेतल्या. तेव्हापासूनच त्यांच्या गोलंदाजीची जादू चालू लागली होती.

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : भारत – पाक सामना ९ जूनला न्यूयॉर्कमध्ये, फायनल २९ जूनला)

१९९०-९१ मध्ये रणजी मॅचमध्ये कपिल देव (Kapil Dev) यांनी बंगालविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्यांनी १४१ धावा केल्या आणि ५ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर ते काउंटी सामने देखील खेळले आहेत. त्यांनी एकूण ४० काउंटी सामने खेळले आणि त्यामध्ये २३१२ धावा केल्या व १४ अर्धशतक ठोकले. त्याचबरोबर १०३ विकेट्स काढल्या. त्यांनी एकंदर संपूर्ण कारकिर्दीत ८३५ विकेट्स घेतल्या आहेत.

त्यांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये भारत विश्वचषक जिंकला होता. क्रिकेट विश्वचषक जिंकणारे तो पहिला भारतीय कर्णधार झाले. कोणत्याही संघासाठी विश्वचषक जिंकणारे ते अजूनही सर्वात तरुण कर्णधार आहेत. म्हणजे तेव्हा ते फक्त २४ वर्षांचे होते. त्यांनी एकदिवसीय सामन्यात २०० विकेट्स घेतया आहेत. त्यांची सर्वोत्कृष्ट धावसंख्या १७५ आहेत. तर कपिल देव (Kapil Dev) यांचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय लेव्हलवर दर्जा मिळवून देणे होय. त्यांच्यामुळे भारतीय संघात विश्वासाची ठिणगी निर्माण झाली. आज भारतीय संघ सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.