ए. आर. रहमान हे नाव उच्चारताच आपल्या कानांमध्ये त्यांनी रचलेलं संगीत वाजू लागतं आणि आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. आज या महान संगीतकाराचा (Music Composer) जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म ६ जानेवारी १९६७ रोजी तामिळनाडूमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आर. के. शेखर होते. ते देखील संगीतकार होते. त्यामुळे संगीत कला त्यांना त्यांच्या वडिलांकडून बाळकडू म्हणून मिळाली आहे. (Happy birthday A.R.Rahman)
रहमान यांनी वेस्टर्न क्लासिकल म्युझिक मध्ये डिप्लोमा केला आहे. त्यांचे खरे नाव ए. एस. दीलिप कुमार असे होते. मात्र १९८९ मध्ये त्यांनी धर्म परिवर्तन करुन इस्लाम स्वीकारला. त्यावेळी ते फक्त २३ वर्षांचे होते आणि मग त्यांनी स्वतःचं नाव ठेवलं अल्लाह रख्खा रहमान, ए. आर. रहमान. ११ व्या वर्षापासूनच ते त्यांच्या वडिलांचे मित्र एम. के. अर्जून यांच्यासोबत ऑर्केस्ट्रामध्ये इन्स्ट्रुमेंट वाजवायचे. पुढे त्यांनी चेन्नईमध्ये रॉक ग्रुप नेमसिस एव्हेन्यूची स्थापना केली. (Happy birthday A.R.Rahman)
पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड
सिंथेसायझर वाजवण्यात ते तरबेज आहेत. त्याचबरोबर पियानो, हार्मोनियम, कीबोर्ड असे कोणतेही वाद्य ते लीलया वाजवू शकतात. म्युझिक जिंगल्स रेकॉर्ड करण्यापासून त्यांनी सुरुवात केली. १९९२ मध्ये मणिरत्नम यांनी रोजा चित्रपटासाठी त्यांना संगीतकार म्हणून घेतलं आणि रोजा चित्रपटाची गाणी प्रचंड गाजली. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. ए. आर. रहमान हे जागतिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी एक आहेत.
(हेही वाचा : Veer Savarkar : आपण ‘राष्ट्राला सावरणारे सावरकर’ आहोत!)
गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय संगीतकार
रहमान यांनी तामिळ व्यतिरिक्त हिंदी आणि इतर अनेक भाषांमधील चित्रपटांना संगीत दिले आहे. टाइम्स मासिकाने त्यांना ‘मोझार्ट ऑफ मद्रास’ ही उपाधी दिली. रहमान हे गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय संगीतकार आहेत.
Le Musk या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन आणि लेखनाच्या क्षेत्रातही पदार्पण
स्लम डॉग मिलेनियर या ब्रिटिश भारतीय चित्रपटासाठी त्यांना संगीतासाठी दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. हा सुद्धा एकप्रकारचा रेकॉर्डच आहे. Le Musk या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन आणि लेखनाच्या क्षेत्रातही पदार्पण केले. हा २०२२ रोजी प्रदर्शित झालेला इंग्रजी चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण रोममध्ये झाले. त्याना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे संगीत ऐकताना असे वाटते की जणू देव त्या संगीतावर विराजमान झाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community