मिस्टर बीन (Mr Bean) हे पात्र कोणाला नाही माहित? प्रत्येकाला या पात्राने हसवले आहे. मिस्टर बीन, जॉनी इंग्लिश अशी विनोदी पात्र जिवंत करणार्या महान कलाकाराचे नाव आहे, रोवन ॲटकिन्सन… ते अभिनेता, लेखक आणि हास्य कलाकार आहेत. त्यांचा जन्म ६ जानेवारी १९५५ रोजी कॉंसेट इंग्लंड येथे झाला.
British Academy Television पुरस्कार –
अॅटकिन्सन (Mr Bean) यांनी १९७९ मध्ये बीबीसी रेडिओ ३ च्या कॉमेडी शोच्या सीरीजमध्ये अभिनय केला, या कार्यक्रमाचे नाव होते, द अॅटकिन्सन पीपल. त्यात काल्पनिक व्यंग्यात्मक मुलाखतींचा समावेश होता, ज्यामध्ये स्वत: अॅटकिन्सन वेगवेगळी भूमिका करायचे. ही मालिका अॅटकिन्सन आणि रिचर्ड कर्टिस यांनी लिहिली होती आणि ग्रिफ रायस जोन्स यांनी निर्मिती केली होती. त्याचबरोबर त्यांनी नॉट द नाइन अ क्लॉक न्यूजमध्ये काम केले. यासाठी त्यांना British Academy Television पुरस्कार मिळाला.
(हेही वाचा – Aditya L1 ची आज खरी परीक्षा; भारत आणखी एक इतिहास रचण्यासाठी सज्ज)
ॲनिमेटेड सिरीज –
चार्ली चाप्लीन यांनी स्वतःचं एक वेगळं पात्र तयार केलं होतं. त्याचप्रकारे मिस्टर बीन (Mr Bean) हे विनोदी पात्र तयार करुन अॅटकिन्सन घराघरात आणि मनामनात पोहोचले. पुढे तर मिस्टर बीनची ॲनिमेटेड सिरीज आली. तसेच ते बाँडपट नेव्हर से नेव्हर अगेन, द विचेस, फोर वेडिंग्ज अँड अ फ्युनरल ), रॅट रेस, स्कूबी-डू अशा चित्रपटांमध्ये झळकले.
झझू या पात्राला आवाज –
द लायन किंगमध्ये त्यांनी झझू या पात्राला आवाज दिला. त्यांनी बीन आणि मिस्टर बीन्स (Mr Bean) हॉलिडे या चित्रपटात मिस्टर बीनची भूमिका साकारली होती. टिव्ही, चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी अनेक स्टेज शोज केले आहेत. २००३ मध्ये ब्रिटिश विनोदवीरांमध्ये सर्वोत्कृष्ट ५० विनोदवीरांमध्ये त्यांचं नाव झळकलं. एक अत्यंत संवेदनशील अभिनेता म्हणून त्यांनी ओळख आहे. सर्वांच्या लाडक्या मिस्टर बीनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community