Coronavirus : भारतात २४ तासांत ७६१ कोरोना रुग्णांची नोंद, १२ जणांचा मृत्यू

केरळ आणि देशाच्या इतर भागात कोरोना झपाट्याने पसरत आहे. गेल्या २४ तासात ७०२ नव्या रुग्णांची नोंद झाली. यादरम्यान ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

215
Coronavirus : भारतात २४ तासांत ७६१ कोरोना रुग्णांची नोंद, १२ जणांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे (Coronavirus) ७६१ रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान केरळमध्ये सध्या १२४९, कर्नाटकात १२४०, महाराष्ट्रात ९१४, तामिळनाडूमध्ये १९०, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्ये १२८ ॲक्टिव्ह प्रकरणं आहेत. त्यामुळे देशातील रुग्णांची संख्या ४३३४ इतकी झाली आहे. (Coronavirus)

मृत्युमुखी पडलेल्या १२ जणांपैकी ५ जण केरळमधील होते. कर्नाटकात ४, महाराष्ट्रात २ आणि उत्तर प्रदेशात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Weather Update : देशात थंडीची लाट तर दक्षिण भारतासह कोकणात पावसाचा अलर्ट)

नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे – मुख्यमंत्री

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन (Coronavirus) हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार २१ डिसेंबर रोजी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Coronavirus)

(हेही वाचा –  Chinese electric product ban: सावधान! चिनी इलेक्ट्रिक वस्तू विकल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेसह दोन लाखांचा दंड)

३३ हजार ऑक्सिजन बेड्स –

सध्या राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स, (Coronavirus) ९ हजार ५०० आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी जेएन वन या नव्या व्हेरिएंटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले. (Coronavirus)

हेही पहा –   

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.