राजस्थानच्या कोटामध्ये शुक्रवारी (५ जानेवारी) संध्याकाळी भोपाळला जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनचे (Jodhpur – Bhopal Express) दोन डबे रुळावरून घसरले त्यामुळे दोन्ही बाजूंची रेल्वे वाहतूक प्रभावित झाली. पर्यायाने अनेक गाड्यांना अन्य मार्गावर वळवावे लागले. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
प्रवाशांना किरकोळ दुखापत –
यासंदर्भात रेल्वे विभागाकडून प्राप्त आधिकारीक माहितीनुसार जोधपुर-भोपाल एक्सप्रेस ट्रेन (Jodhpur – Bhopal Express) भोपाळला जात होती. ही गाडी शुक्रवारी रात्री कोटा जंक्शनजवळ पोहोचली तेव्हा हा अपघात झाला. रेल्वेचे डबे घसरल्याने प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
(हेही वाचा – Weather Update : देशात थंडीची लाट तर दक्षिण भारतासह कोकणात पावसाचा अलर्ट)
कोटा जंक्शन जवळ घडला अपघात –
ही ट्रेन शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमाराला जोधपूरहून (Jodhpur – Bhopal Express) निघाली होती. कोटाजवळ रेल्वेचे २ डबे घसरले. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. हा अपघात कोटा जंक्शन जवळच झाल्याने रेल्वे टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. तसेच अपघातग्रस्त डब्यातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान आज, शनिवारी (६ जानेवारी) सकाळपर्यंत रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्यात आला असून जोधपूर-भोपाळ रेल्वेला रवाना करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Jodhpur – Bhopal Express)
दरम्यान कोटा विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाने (डीआरएम) प्रवाशांसाठी आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहेत.
(हेही वाचा – Coronavirus : भारतात २४ तासांत ७६१ कोरोना रुग्णांची नोंद, १२ जणांचा मृत्यू)
आपत्कालीन संपर्क क्रमांक
0744-2467171
0744-2467172
9001017097
9414018692
9887143093
हेही पहा –
Join Our WhatsApp Community