Virat Kohli Bhangra : केपटाऊन कसोटीतील विजयानंतर विराट कोहलीचं भांगडा नृत्य

मैदानावरील दामदार कामगिरीबरोबरच प्रेक्षकांना आपल्या चित्रविचित्र हालचालींनी खिळवून ठेवणं हे विराट कोहलीचं वैशिष्ट्य आहे 

321
Virat Kohli Bhangra : केपटाऊन कसोटीतील विजयानंतर विराट कोहलीचं भांगडा नृत्य
Virat Kohli Bhangra : केपटाऊन कसोटीतील विजयानंतर विराट कोहलीचं भांगडा नृत्य
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत फलंदाजीत दमदार कामगिरी करत १७० धावा केल्या. एरवी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेल्या या कसोटीत भारतातर्फे विराटचीच कामगिरी अव्वल ठरली. के एल राहुलनेही (KL Rahul) पहिल्या कसोटीत शतक झळकावलं. आणि केपटाऊन कसोटी जिंकल्यावर विराटच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. ड्रेसिंग रुममध्ये भावनातिरेकाने त्याने प्रशिक्षक विराट कोहलीला (Virat Kohli) मिठी मारली.

आणि मग त्याने मैदानातही चाहते आणि ग्राऊंडमनना स्वाक्षरी देऊन खुश केलं. मालिकेचा फ्रीडम चषक दोन्ही संघांना विभागून देण्यात आला. यावेळी एकत्र फोटोसेशनच्या वेळी विराटने पंजाबी नृत्य भांगडाची पोझ देत पुन्हा एकदा सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं.

(हेही वाचा – Railway Megablock : मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक ‘या’ वेळेत ब्लॉक)

पहिल्या सेंच्युरियन कसोटीत भारताचा १ डाव आणि ३१ धावांनी पराभव झाला होता. तो पराभव भारतीय संघाच्या नक्कीच जिव्हारी लागला. त्यामुळेच केपटाऊनमधील विजयाचं मोल संघासाठी मोठं होतं. आणि खेळाडूंच्या विजयानंतरच्या देहबोलीत ते जाणवतही होतं.

या विजयाबरोबरच भारतीय संघाने मालिका तर बरोबरीत सोडवलीच. शिवाय आयसीसी क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल तिघांत स्थान मिळवलं आहे. भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.