- ऋजुता लुकतुके
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी-२० आणि कसोटी मालिकेत यशस्वी जयवालने भारताकडून पदार्पण केलं. आणि हा दौरा किती खडतर असतो याचा अनुभवही घेतला. कारण, अनियमित उसळी घेणाऱ्या चेंडूंसमोर यशस्वीला दोनही कसोटीत शरणागती पत्करावी लागली. केपटाऊनमध्ये दुसऱ्या डावात यशस्वी निदान २० धावांचा टप्पा ओलांडू शकला. पण, सेंच्युरियनचे २ डाव आणि केपटाऊनचा पहिला डाव इथं तो दुहेरी आकडाही गाठू शकला नव्हता. (Yashasvi Jaiswal)
पण, तरीही यशस्वी ज्येष्ठ खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रुममध्ये घालवलेल्या वेळेसाठी समाधानी आहे. प्रत्येकाकडून काही ना काही शिकल्याचं त्याचं म्हणणं आहे. (Yashasvi Jaiswal)
(हेही वाचा – ICC Test Ranking : भारताला मागे टाकून ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर)
सलामीवीर म्हणून मैदानावर एकत्र असतानाही रोहित सकारात्मक होता
‘रोहित शर्माने कर्णधार म्हणून ड्रेसिंग रुममध्ये सतत सकारात्मक वातावरण ठेवलं आणि जिंकण्याची उमेद दिली,’ असं यशस्वी म्हणतो. ‘सलामीवीर म्हणून मैदानावर एकत्र असतानाही रोहित सकारात्मक होता. आणि चेंडू नवीन असताना चांगली धावसंख्या उभारण्यासाठी तो सतत प्रोत्साहित करायचा. मला मानसिक बळ देण्याचं कामही त्याने वेळोवेळी केलं,’ असं यशस्वी रोहितविषयी बोलताना म्हणाला. (Yashasvi Jaiswal)
दौरा अपेक्षेप्रमाणेच खडतर होता. आणि त्यातून खूप काही शिकायला मिळालं, असं यशस्वीला वाटतं. ‘इथं चेंडू अनियमित उसळी घेतो. हे ठाऊक असतानाही हातून त्याच त्याच चुका झाल्या. आता कुठल्या चुका इथून पुढे टाळायच्या हे या दौऱ्यात नक्की कळलं. आणि त्याचा मला कारकीर्दीत पुढे उपयोग होईल,’ असं यशस्वी म्हणाला. (Yashasvi Jaiswal)
राहुल द्रिवड यांनी प्रशिक्षक म्हणून मुक्तपणे फलंदाजी करण्याचा आणि फलंदाजी करताना चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा सल्ला दिला, असंही यशस्वीने स्पष्ट केलं. (Yashasvi Jaiswal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community