Virat Kohli Gifts Jersey : विराट कोहलीने आपली जर्सी जेव्हा केशव महाराजला भेट दिली

केशव महाराजने भारतीय स्टार खेळाडू विराट कोहलीने दिलेली भेट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

219
Virat Kohli Gifts Jersey : विराट कोहलीने आपली जर्सी जेव्हा केशव महाराजला भेट दिली
Virat Kohli Gifts Jersey : विराट कोहलीने आपली जर्सी जेव्हा केशव महाराजला भेट दिली
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. पहिली सेंच्युरियन कसोटी भारताने १ डाव आणि ३१ धावांनी गमावल्यावर दुसऱ्या केपटाऊन कसोटीत मात्र ७ गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंचं एकत्र फोटोसेशनही झालं. मालिकेचा फ्रीडम करंडक दोन्ही संघांना विभागून देण्यात आला. (Virat Kohli Gifts Jersey)

केपटाऊन कसोटीनंतर आफ्रिकन फिरकी गोलंदाज केशव महाराजने (Keshav Maharaj) भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) आवर्जून भेट घेतली. आणि भेटीचे क्षण त्याने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर टाकले आहेत. विराटने आपली कसोटीमधील १८ क्रमांकाची जर्सी स्वाक्षरी करून महाराजला भेट दिली. यावर महाराजने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलंय, ‘भिंतीवर फ्रेम करून लावण्यासाठी महत्त्वाची भेट. विराट कोहलीचे (Virat Kohli) आभार.’ (Virat Kohli Gifts Jersey)

 

View this post on Instagram

 

A post shared by Keshav Maharaj (@keshavmaharaj16)

(हेही वाचा – NCP : राष्ट्रवादीत दादा-ताईमध्ये गटबाजी, नव्या दादांना ‘साईडलाइन’ केल्याची चर्चा)

दोघं मैदानातही अनेकदा एकमेकांशी हास्यविनोद करताना दिसले. केशव महाराज (Keshav Maharaj) फलंदाजीला आल्यावर मैदानावरील डीजे ‘राम सियाराम’ या गाण्याची धून वाजवत असे. त्यावरून भारतीय यष्टीरक्षक के एल राहुलनेही एकदा केशव महाराजची मस्करी केली होती. तर विराटने दुसऱ्या कसोटीत केशव महाराज (Keshav Maharaj) फलंदाजीला आल्यावर दुसऱ्या स्लिपमधून त्याला दोन्ही हात जोडून नमस्कार केला. आणि हाताने धनुष्याला बाण लावल्याचा अविर्भावही केला. केशव महाराजनेही (Keshav Maharaj) त्याला हसून प्रतिसाद दिला होता. (Virat Kohli Gifts Jersey)

सोशल मीडियावर दोघांमधील संभाषण चांगलंच व्हायरल झालं होतं. (Virat Kohli Gifts Jersey)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.