SEBI Allows Short Selling : सेबीची सर्व प्रकारच्या सौद्यांमध्ये शॉर्टसेलिंगला परवानगी

अगदी फ्यूचर ऑप्शनच्या सौद्यांमध्येही आता शॉर्ट सेलिंगला परवानगी मिळाली आहे.

212
SEBI Allows Short Selling : सेबीची सर्व प्रकारच्या सौद्यांमध्ये शॉर्टसेलिंगला परवानगी
SEBI Allows Short Selling : सेबीची सर्व प्रकारच्या सौद्यांमध्ये शॉर्टसेलिंगला परवानगी
  • ऋजुता लुकतुक

शेअर बाजारातील सर्व प्रकारच्या सौद्यांमध्ये आता शॉर्ट सेलिंगची सोय असेल. सेबीने शुक्रवारी हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. अगदी फ्यूचर ऑप्शनमध्ये व्यवहार होत असलेल्या शेअरमध्येही शॉर्ट सेलिंग करता येईल. पण, त्याचवेळी नेकेड शॉर्टसेलिंगला सेबीने परवानगी नाकारली आहे. (SEBI Allows Short Selling)

शॉर्ट सेलिंग (Short Selling) म्हणजे सौदा करताना तुमच्याकडे नसलेले शेअर विकण्याची परवानगी. म्हणजे सध्या तुमच्याकडे ते शेअर नसले तरी ठरावीक मुदतीत तुम्ही ते विकत घेणं अध्यारुत असतं. आणि शेवटी तो सौदा तुम्हाला पूर्ण करावाच लागतो. एखादा शेअर खाली जाणार असा अंदाज असेल तर तुम्ही शॉट सेलिंगची (Short Selling) रणनीती प्रभावीपणे वापरु शकता. म्हणजे तुमच्याकडे आधी शेअर नसताना जास्त किमतीला ते विकून टाकायचे. आणि नंतर कमी किमतीला ते विकत घेऊन सौदा पूर्ण करायचा. (SEBI Allows Short Selling)

(हेही वाचा – Raj Thackeray : कोकण किनारपट्टीला मोठा धोका; राज ठाकरेंचा इशारा)

जे संस्थागत गुंतवणूकदार आहेत, त्यांना डे-ट्रेडिंगसाठी अजून मान्यता मिळालेली नाही. फ्युचर आणि ऑप्शन प्रकारात ज्या शेअरची सौदेबाजी होते, ते सर्व शेअर शॉर्ट सेलिंगसाठी (Short Selling) उपलब्ध असतील. आणि ठरावीक कालावधीनंतर अशा शेअरचा फेरआढावा सेबीकडून घेतला जाईल. (SEBI Allows Short Selling)

संस्थागत गुंतवणूकदारांनी शेअरचा व्यवहार नोंदवताना तो शॉर्टसेलसाठी आहे का, याची ताबडतोब स्पष्टता देणं अनिवार्य करण्यात आलंय. तर किरकोळ गुंतवणूकदारांनीही दिवसाच्या शेवटी शॉर्टसेल व्यवहाराची माहिती एक्सचेंजला द्यायची आहे. (SEBI Allows Short Selling)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.