Deep Cleaning Drive : नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची; स्वच्छतेत खंड पडू देऊ नका – मुख्यमंत्री

संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा सलग पाचवा आठवडा

293
Deep Cleaning Drive : सखोल स्वच्छता मोहिमेला मिळते यश, हवेतील प्रदूषणात होते घट

स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त मुंबईसाठी संपूर्ण स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली असून राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी महास्वच्छता अभियानाला देखील प्रारंभ झाला आहे. शहरांमधील सर्वंकष स्वच्छतेवर भर देण्यासाठी यंत्रणा अहोरात्र काम करीत असून ही स्वच्छतेची मोहिम खंड पडू न देता नियमितपणे सुरु ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले. (Deep Cleaning Drive)

मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी मागील ३ डिसेंबरपासून शहरात ‘संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग)’ मोहीम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू आहे. सलग पाच आठवड्यापासून मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) हे सुट्टीच्या दिवशी पहाटेपासून स्वच्छता मोहिमेत (डीप क्लिनिंग) सहभागी होवून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवित आहेत. (Deep Cleaning Drive)

शनिवारी कुलाबा येथील आयएनएस शिक्रा येथून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला. याठिकाणी कौशल्य विकास उद्योजगता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मनपाचे आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त संजोग कबरे, डॉ संगीता हसनाळे, उल्हास महाले, प्रमुख अभियंता मनिशकुमार पटेल आदी उपस्थित होते. (Deep Cleaning Drive)

(हेही वाचा – Virat Kohli Bhangra : केपटाऊन कसोटीतील विजयानंतर विराट कोहलीचं भांगडा नृत्य)

विद्यार्थी, स्वच्छता कर्मचाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

आयएनएस शिक्रा परिसरातील स्वच्छता मोहिमेची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्याशी संवाद साधून रस्त्यावर माती, कचरा राहणार नाही, साचलेल्या कचऱ्याचे विलगीकरण याविषयी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. शिवाय येथील मुंबई पब्लिक स्कूल, कुलाबा इंग्लिशचे विद्यार्थी, शिक्षक यांनाही स्वच्छता अभियानविषयी माहिती देत मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले. (Deep Cleaning Drive)

डीप क्लिनिंग (Deep Cleaning Drive) ही मोहीम मुंबईपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभर करण्यात आली आहे. राज्यातही मोठ्या शहरात स्वच्छता मोहीम नियमित सुरू असल्याने हवेतील प्रदूषण कमी राहण्यास मदत होणार आहे. यामुळे स्वच्छता करणाऱ्या खऱ्या हिरोंकडे शासनाचे लक्ष राहील, त्यांच्या समस्या, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. (Deep Cleaning Drive)

पूर्व मुक्त मार्गाच्या (फ्री वे) सुरूवातीला आणि या मार्गावरील वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीजवळ मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. याठिकाणीही मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेले पादचारी मार्ग, भिंती पाण्याने साफ केल्या. स्वच्छता करताना पाण्यातून वाहून जाणारी माती, कचऱ्याची साफसफाई स्वच्छता कर्मचारी करीत होते. कधी हातात पाण्याचा पाईप तर कधी झाडू घेवून स्वत: मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) स्वच्छता करीत असल्याचे पाहून अधिकारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची प्रेरणा मिळत होती. (Deep Cleaning Drive)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध)

माध्यम प्रतिनिधींना दिल्या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा ६ जानेवारी हा जन्मदिवस. हा दिन पत्रकार दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकार, कॅमेरामन यांना मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुष्पगुच्छाने सन्मानित करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. (Deep Cleaning Drive)

पूर्व द्रूतगती मार्गावरील वाहतूक पोलीस चौकीजवळही मुख्यमंत्री शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी आमदार यामिनी जाधव यांच्यासह मनपाचे अधिकारी सामील झाले होते. (Deep Cleaning Drive)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.