North West Constituency : उबाठा शिवसेनेच्या आणखी दोन संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत

मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांना टक्कर देण्याचा प्रयत्न शिवसेना (उबाठा) यांच्याकडून सुरु असून पक्षाने अमोल किर्तीकर यांचे नाव निश्चित केले आहे. परंतु दुसरीकडे काँग्रेसने या मतदार संघावर दावा केला असला तरी शिवसेना उबाठा काही हा मतदार संघ सोडण्याच्या तयारीत नाही.

308
North West Constituency : उबाठा शिवसेनेच्या आणखी दोन संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत
North West Constituency : उबाठा शिवसेनेच्या आणखी दोन संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत

मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांना टक्कर देण्याचा प्रयत्न शिवसेना (उबाठा) यांच्याकडून सुरु असून पक्षाने अमोल किर्तीकर यांचे नाव निश्चित केले आहे. परंतु दुसरीकडे काँग्रेसने या मतदार संघावर दावा केला असला तरी शिवसेना उबाठा काही हा मतदार संघ सोडण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे शेवटच्या वेळी दगाफटका झाल्यास शिवसेना उबाठाने आमदार सुनील प्रभु यांचा पर्याय निश्चित करून ठेवला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रभु हे जर उभे राहिल्यास येथील निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता विभागातील जनतेकडून व्यक्त केली जात आहे. (North West Constituency)

त्या वादावर पाडला पडदा

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे गजानन किर्तीकर हे ५ लाख ७० हजार ६३ मतांनी विजयी झाले होते, काँग्रेसचे संजय निरुपम यांना केवळ ३ लाख ९ हजार ७३५ मते मिळाली होती. सलग दोन वेळा किर्तीकर हे निवडून आले होते. परंतु शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर किर्तीकर हे आता शिवसेना उबाठा गटात सामील झाले आहेत. त्यामुळे या मतदार संघात शिवसेना उबाठा गटाने गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल यांना उपनेतेपदी बढती देत त्यांना या मतदार संघाचे भावी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. गजानन किर्तीकर वयोमानानुसार निवडणूक लढवण्याची शक्यता कमी असल्याने त्या जागेवर रामदार कदम यांनी आपल्या मुलासाठी दावा केला होता. त्यामुळे यावरून वादही झाले होते. परंतु यावर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडदा पाडला आहे. (North West Constituency)

(हेही वाचा – Ind vs SA 2nd Test : केपटाऊनमध्ये मिळवलेल्या विजयानंतर ड्रेसिंग रुममधील काही मजेदार क्षण)

प्रभुंचाही पर्याय

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा दगाफटका झाल्यास पर्याय म्हणून शिवसेना उबाठा गटाने अमोल किर्तीकर यांच्याबरोबरच आमदार सुनील प्रभु यांचा पर्याय तयार ठेवला असल्याचे बोलले जात आहे. आमदार सुनील प्रभु हे महापौर राहिलेले नसून सध्या ते पक्षाचे विभागप्रमुखही आहेत. त्यामुळे सर्व विधानसभा क्षेत्रात त्यांचे चांगल्याप्रकारे वर्चस्व आहे. हे पाहता अमोल किर्तीकर हे उभे राहिल्यास त्यांच्या आडनावाचा फायदा करून घेतला जाईल, किंवा शेवटच्या क्षणाला किर्तीकर यांचा पत्ता कापला गेल्यास प्रभु यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची रणनिती निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे. (North West Constituency)

भाजपकडूनही चाचपणी सुरु

शिवसेनेकडून सध्या तरी गजानन किर्तीकर यांनाच निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता असून त्यांच्या ऐवजी नवीन चेहरा दिला जाणार नाही. मात्र, या मतदार संघावर भाजपचही नजर असून पक्षाचे आमदार अमित साटम यांच्यावर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे भाजपकडूनही या मतदार संघाची चाचपणी सुरु आहे. या मतदार संघात शिवसेना उबाठा गटाचे तीन आमदार आणि भाजपचे तीन आमदार असल्याने भाजपचा या मतदार संघावर दावा होत आहे. त्यामुळे भाजपकडून अमित साटम यांचे नाव चर्चेत असले तरी कोणत्याही परिस्थितीत या मतदार संघात युतीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपवरच आहे. (North West Constituency)

(हेही वाचा – Yashasvi Jaiswal : दक्षिण आफ्रिका मालिकेतून यशस्वी जयसवाल काय शिकला?)

तर शिवसेनेचा उमेदवार बदलणार

त्यामुळे भाजपला जर मतदार संघ न मिळाल्यास किर्तीकर यांच्या ऐवजी अमोल किर्तीकर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन निवडणूक रिंगणात उतरवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच शिवसेना उबाठा गटाने प्रभु यांचा पर्याय निवडून ठेवला असल्याचे बोलले जात आहे. (North West Constituency)

काँग्रेसचे शर्थीचे प्रयत्न

मात्र, या उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात सन २००९मध्ये कांग्रेसच्या तिकीटावर गुरुदास कामत हे निवडून आले होते. त्यानुसार सातत्याने शिवसेना भाजप युतीचा उमेदवार म्हणून किर्तीकर हे निवडून येत आहेत. त्यामुळे काँग्रेसनेही या मतदार संघावर दावा केला आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत अनुक्रमे सन २०१४ व २०१९मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांनी निवडणूक लढवली होती, त्यामुळे काँग्रेस हा मतदार संघ आपल्याकडे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र, शिवसेना उबाठा गट हा मतदार संघ सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत. (North West Constituency)

समीर देसाईंच्या रुपात तिसरा पर्यायही तयार

त्यामुळे अमोल किर्तीकर आणि त्यानंतर आमदार सुनील प्रभु आणि समीर देसाई यांच्या नावाचा विचार होऊ शकेल असे बोलले जात आहे. समीर देसाई हे गुरुदास कामत यांचे भाचे असून काँग्रेस सोडून ते भाजपमध्ये गेले होते आणि भाजप सोडून ते आता शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे समीर देसाईच्या रुपात या मतदार संघात शिवसेना उबाठा गटाने तिसरा पर्यायही निवडून ठेवला असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – Atal Sagari Setu वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा प्रकल्प – मुख्यमंत्री)

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात निवडून आलेले लोकप्रतिनिधी

सन २००९- १४ : गुरुदास कामत, काँग्रेस

सन २०१४-२०१९ : गजानन किर्तीकर, शिवसेना

सन २०१९- २०२४ : गजानन किर्तीकर, शिवसेना (North West Constituency)

विधानसभा मतदार संघ

गोरेगाव : विद्या ठाकूर, भाजप

दिंडोशी : सुनील प्रभू, शिवसेना उबाठा

जोगेश्वरी पूर्व : रविंद्र वायकर, शिवसेना उबाठा

वर्सोवा : डॉ.भारती लव्हेकर, भाजप

अंधेरी पश्चिम: अमित साटम, भाजप

अंधेरी पूर्व : ऋतुजा लटके, शिवसेना उबाठा (North West Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.