Unauthorized Boards : आता अनधिकृत फलकांची छपाई करणाऱ्यांची खैर नाही

मुंबईत सुशोभीकरणाची मोहिम राबवली जात असली तरी अनधिकृत फलक आणि बॅनर्समुळे मुंबईला बकाल बनवले जात आहे. त्यामुळे रस्ते दुभाजकांसह रस्त्यांवर हे अनधिकृत बॅनर्स व फलक लावले जात असल्याने यापुढे लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणारच आहे, पण आता या बॅनर्स व फलकांची छपाई करण्यांना टार्गेट केले जाणार आहे.

457
Unauthorized Boards : आता अनधिकृत फलकांची छपाई करणाऱ्यांची खैर नाही
Unauthorized Boards : आता अनधिकृत फलकांची छपाई करणाऱ्यांची खैर नाही

मुंबईत सुशोभीकरणाची मोहिम राबवली जात असली तरी अनधिकृत फलक आणि बॅनर्समुळे मुंबईला बकाल बनवले जात आहे. त्यामुळे रस्ते दुभाजकांसह रस्त्यांवर हे अनधिकृत बॅनर्स व फलक लावले जात असल्याने यापुढे लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणारच आहे, पण आता या बॅनर्स व फलकांची छपाई करण्यांना टार्गेट केले जाणार आहे. त्यामुळे अनधिकृत फलक लावणाऱ्यांसह ते छपाई करून देणाऱ्या प्रिंटर्स व्यावसायिकांनाही नोटीस बजावण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. (Unauthorized Boards)

मुंबई महानगरातील अतिक्रमण निर्मूलन विषयक कार्यवाहीचा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात शुक्रवारी ५ जानेवारी २०२४ रोजी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, सहायक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) मृदुला अंडे यांच्यासह परवाना विभागाचे आणि इतर सर्व संबंधित विभागांतील अधिकारी उपस्थित होते. मुंबई महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत फलक, बॅनर्स, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमण आदींबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले. (Unauthorized Boards)

(हेही वाचा – Atal Sagari Setu वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा प्रकल्प – मुख्यमंत्री)

अनधिकृत फलकांमुळे सुशोभीकरणात बाधा

मुंबई सुशोभीकरणाची महापालिकेच्यावतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबई अधिकाधिक सुंदर, स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. असे असताना, मुंबईत रस्ते दुभाजकांमध्ये लावलेल्या अनधिकृत फलकांमुळे सुशोभीकरणात बाधा येत आहे. कोणतीही परवानगी न घेता फलक लावले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे असे अनधिकृत फलक लावणाऱ्यांसह ते छपाई करून देणाऱ्या प्रिंटर्स व्यावसायिकांनाही नोटीस बजावण्याचे निर्देश डॉ. जोशी यांनी बैठकीत दिले. (Unauthorized Boards)

तसेच मुंबईत आढळून येणारी बेवारस व भंगार वाहने हटविण्याची कारवाई करावी. पदपथांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सतत सुरू असते. मात्र यापुढे या कारवाईला वेग देण्यात यावा, त्यासाठी प्रसंगी पोलिसांची मदत लागली तरी घ्या. सर्व कारवाई करताना महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयांतील तसेच विविध खात्यांनी एकत्रितपणे व समन्वयाने मोहीम राबवावी. सहभागी सर्व संबंधित विभागांनी दररोज जी कारवाई केली, त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा, असेही अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. (Unauthorized Boards)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.