माहिम कोळीवाड्यात (Mahim Koliwada) आतापर्यंत दिव्यांमध्ये असलेला अंधार आता कायमचा दूर करण्याचा प्रयत्न झाला असून कोळीवाड्यातील (Mahim Koliwada) प्रत्येक गल्ली आणि आसपासचा परिसरात प्रखर विद्युत दिव्यांनी प्रकाशमय करून टाकले आहे. माहिम कोळीवाड्यासह (Mahim Koliwada) आसपासच्या परिसरात तब्बल ३२ हेरिटेज दर्जाचे खांब बसवण्यात आले आहेत. त्यामुळे कोळीवाड्यातील अंधार तर आता दूर झालाच आहे, शिवाय आता आसपासच्या परिसरातील अंधारही आता कायमच दूर होऊन या परिसरात लखखाट दिसू लागला आहे. (Mahim Koliwada)
माहिम कोळीवाड्याच्या सुशोभीकरणासाठी शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन विकास निधी मंजूर करून दिला आहे. या सुशोभीकरणाअंतर्गत कोळीवाड्यातील पदपथावर विद्युत खांब बसवून सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत हे विजेचे खाब बसवून प्रकाश दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी सुमारे ७८ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. यासाठी अस्मी एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Mahim Koliwada)
(हेही वाचा – Recruitment : 1 हजारहून अधिक वनरक्षक पदांची होणार भरती; वनमंत्र्यांचा मोठा निर्णय)
माहिम कोळीवाड्यात (Mahim Koliwada) मुंबईतील पहिले सी फुड प्लाझा बनवण्यात आले आहे. कोळीवाड्यातील सी फुडची अस्सल लज्जतदार पदार्थांची चव चाखता यावी यासाठी शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सी फुड प्लाझा करता तंबू स्वरुपात खवय्यांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या सी फुड प्लाझाच्या परिसरात तसेच कोळीवाड्यातील सर्व पायवाटांवर तसेच कोळीवाड्याच्या मागील बाजुला समुद्राच्या दिशेला अशाप्रकारे ३२ विजेचे हेरिटेज खांब हे जी उत्तर विभागाच्या इलेक्ट्रीक विभागाच्या प्रयत्नातून तसेच देखरेखीखाली बसवण्यात आले आहेत. हे खांब एलईडीचे असून त्यामुळे या दिव्यांचा प्रकाश अधिकप्रमाणात सर्वदूर पसरुन सर्व परिसरत प्रकाशमय झालेला पहायला मिळत आहे. या कोळीवाड्यासह माहिम किल्लाही (Mahim Fort) प्रकाशमय केला आहे. जिल्हा नियोजन विकास निधीतून माहिम किल्ल्याच्या (Mahim Fort) सुशोभीकरणाचे काम हाती घेत हे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे माहिम किल्ल्याचा परिसरही प्रकाशाने उजळून निघाला आहे. (Mahim Koliwada)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community