स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातून सुटका झाली होती, तो दिवस ऐतिहासिक होता. पुण्यातील येरवडा कारागृहातून सुटका झाल्यानंतर सावरकर रत्नागिरीला गेले होते. आज, ६ जानेवारी २०२४ रोजी या घटनेला १०० वर्षे होत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. आज या यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळणे हा माझा सन्मान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या चित्रपटाची निर्मिती करायला मिळाली, हे माझे भाग्य आहे, अशी भावना अभिनेते रणदीप हुडा (Randeep Hooda) यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
(हेही वाचा – Veer Savarkar : कोठडीत बंद करून तुम्ही सूर्याचे तेज अडवू शकत नाही – शरद पोंक्षे)
‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक मुंबई’ यांच्या वतीने ६ जानेवारी रोजी पुण्यातील येरवडा कारागृह ते फर्ग्युसन महाविद्यालय अशी स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा (Swatantryaveer Savarkar Mukti Shatabdi Yatra) काढण्यात आली. या यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
अशी झाली यात्रा
६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) यात्रेला सुरुवात करण्यात आली. कारागृह अधीक्षकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांच्याकडे सोपवली. तिथून पुढे अभिनेते रणदीप हुडा (Randeep Hooda) ती प्रतिमा घेऊन कारागृहातून बाहेर आले. यानंतर शंखनादाने आणि ढोल-ताशांच्या गजरात घोषणा देत यात्रा मार्गस्थ झाली. फर्ग्युसन महाविद्यालयात या यात्रेची सांगता झाली.
सध्या बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) हे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रणदीपने स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community