ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही म्हणजे नाही. आरक्षण स्वतंत्र्य घ्या. ओबीसीमधून आरक्षण तुम्हाला मिळणार नाही. आमचा मराठा आरक्षणाला आणि मराठा समाजालाही विरोध नाही. पण आरक्षणाखाली जी झुंडशाही सुरु आहे, त्याला आमचा विरोध आहे, अशा शब्दात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला. ते पंढरपूर येथे झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात (OBC Melava) बोलत होते. या वेळी ओबीसी समाजाचे अनेक नेते व्यासपिठावर उपस्थित होते. (OBC Reservation)
(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळणे हा माझा सन्मान – रणदीप हुडा)
मंत्रालयात 54 टक्के मराठा
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुढे म्हणाले की, सारखं आमची पोरं गरीब असं म्हटलं जातं. पण यांची 200 पोरं गाड्या घेऊन मुंबईत गेली आहेत. कुठल्या मैदानावर उपोषण करायचं ते पाहण्यासाठी. आरक्षण हे गरिबी आणि श्रीमंतीवर नाही. आरक्षण ज्या समाजाला काही मिळत नाही त्यांच्यासाठी नाही. त्यामुळे आरक्षण हे तुम्हाला तुम्ही श्रीमंत आहात याच्यावर नाही, तुम्ही सामाजिक दृष्ट्या किती मागासलेले आहात याच्यावर अवलंबून आहे. मंत्रालयातही 54 टक्के मराठा समाजाची माणसं आहेत, असे म्हणून भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर वार केला.
(हेही वाचा – Recruitment : 1 हजारहून अधिक वनरक्षक पदांची होणार भरती; वनमंत्र्यांचा मोठा निर्णय)
अन्याय करणारे बदलले आहेत
”आज अन्याय करणारे बदलले आहेत. ज्योतिबांनी जेव्हा शाळा काढण्याचे काम हाती घेतले, तेव्हा त्यांच्यासोबत अनेक ब्राह्मण देखील होते. त्यांना ब्राह्मणांनी मदत केली. काहीही झाले, तरी आम्ही ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही. मला मंत्रीपदाची पर्वा नाही. मंत्रीमंडळातही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर जे बोलायचं ते बोललोय मी. त्यामुळे मतांकडे पाहून तुम्ही भाषणे करू नका. मते आमच्याकडेही आहेत ‘, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुढे म्हटले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community