Cocaine Capsules Seized : नऊ कोटींच्या कोकेनने भरलेल्या कॅप्सूल जप्त, दोन परदेशी नागरिकांना अटक

दुकलीजवळून जप्त करण्यात आलेल्या कोकेन ची आंतरराष्ट्रीय बाजरपेठेत ९ कोटी रुपये किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जप्त करण्यात आलेला कोकेन हा अमली पदार्थ नवी मुंबई येथे एका व्यक्तीला देण्यात येणार होते अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.

216
Cocaine Capsules Seized : नऊ कोटींच्या कोकेनने भरलेल्या कॅप्सूल जप्त, दोन परदेशी नागरिकांना अटक
Cocaine Capsules Seized : नऊ कोटींच्या कोकेनने भरलेल्या कॅप्सूल जप्त, दोन परदेशी नागरिकांना अटक

साकीनाका पोलिसांनी (Sakinaka Police) २ परदेशी नागरिकांना कोकेन या अमली पदार्थाने भरलेल्या कॅप्सूलसह अटक करण्यात आली आहे. या दुकलीजवळून जप्त करण्यात आलेल्या कोकेन ची आंतरराष्ट्रीय बाजरपेठेत ९ कोटी रुपये किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जप्त करण्यात आलेला कोकेन हा अमली पदार्थ नवी मुंबई येथे एका व्यक्तीला देण्यात येणार होते अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. (Cocaine Capsules Seized)

डेनियल नायमेक (३८) आणि जोएल अलेजांद्रो वेरा रामोस (१९) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. डेनियल हा नायजेरियन नागरिक असून जोएल हा व्हेनेज्युएला देशाचा नागरिक आहे. अंधेरी पूर्व साकीविहार रोड येथील हंसा इंडस्ट्रीज जवळ एक नायजेरियन इसम संशयास्पदरित्या उभा असल्याचे साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नागरे यांना आढळून आला. नागरे यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तो गोंधळला आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला असता, नागरे आणि त्याच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या एका बॅगेत पिवळ्या रंगाचे कॅप्सूल आढळून आले. डेनियल नायमेक असे ताब्यात घेण्यात आलेल्या नायजेरियनचे नाव असून पोलिस त्याला कॅप्सूलसह साकीनाका पोलीस (Sakinaka Police) ठाण्यात अणूंच्या कॅप्सूलची तपासणी केली असता त्या कॅप्सूल मध्ये कोकेन हा अमली पदार्थ मिळून आला. (Cocaine Capsules Seized)

(हेही वाचा – Ramesh Bais : शाश्वत बांबू विकासातून महाराष्ट्राला जागतिक मान्यता मिळेल)

पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याला जोएल अलेजांद्रो वेरा रामोस याने या कॅप्सूल दिल्या असून हे कॅप्सूल नवी मुंबईत एका नायजेरियन नागरिकाला देण्यात येणार होत्या. साकीनाका पोलिसांनी जोएका याला साकीनाका येथील एका हॉटेलमधूल ताब्यात घेऊ त्याच्याकडे चौकशी केली असता तो व्हेनेज्युएलाचा नागरिक असून तो दक्षिण आफ्रिका येथून कोकेन या अमली पदार्थाने भरलेल्या कॅप्सूल स्वतःच्या पोटातून भारतात घेऊन आला होता. मुंबई विमानतळा वरून सुखरूप बाहेर पडल्यानंतर त्याने साकीनाका परिसरात एका हॉटेलमध्ये खोली बुक करून त्या ठिकाणी आला व हॉटेलच्या खोलीत पोटातील कोकेनने भरलेल्या कॅप्सूल उलटीच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आल्या, त्यानंतर या कॅप्सूलचा डिलेव्हरी त्याने डेनियल नायमेक यांच्याकडे दिली. डेनियल हा हे कॅप्सूल नवीमुंबई येथे एकाला देणार होता अशी माहिती समोर आली. साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही परदेशी नागरिकांना अटक करून त्याच्या विरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघाजवळून जप्त करण्यात आलेले कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जवळपास ९ कोटी किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Cocaine Capsules Seized)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.