१३ डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाली होती. या प्रकरणी शुक्रवार, 5 जानेवारी रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी झाली. (Parliament security breach) या वेळी दिल्ली पोलिसांच्या मागणीवरून अतिरिक्त न्यायाधीश हरदीप कौर यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत 13 जानेवारीपर्यंत वाढ केली आहे.
या वेळी संसदेच्या सुरक्षेचा भंग करणाऱ्या 6 आरोपींपैकी 5 जणांची पॉलीग्राफ चाचणी होणार आहे. 2 आरोपी मनोरंजन आणि सागर यांनी कोर्टात नार्को अॅनालिसिस (Narco Analysis) आणि ब्रेन मॅपिंग (Brain Mapping) चाचणीसाठी संमती दिली आहे. उर्वरित ३ आरोपी अमोल, ललित आणि महेश यांनीही पॉलिग्राफी चाचणीसाठी होकार दिला आहे. संसदेबाहेर घोषणाबाजी करणारा सहावा आरोपी नीलम आझादने पॉलीग्राफ चाचणी करण्यास नकार दिला आहे.
(हेही वाचा – Meenatai Thackeray Market : दादरच्या मिनाताई ठाकरे फुल मार्केटचा होणार पुनर्विकास)
न्यायालयाकडे मागितला 15 मिनिटांचा वेळ
६ जानेवारी रोजी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. बचाव पक्षाचे वकील अमित शुक्ला यांनी दिल्ली पोलिसांच्या पॉलिग्राफी चाचणीच्या मागणीवर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी न्यायालयाकडे 15 मिनिटांचा वेळ मागितला. न्यायालयाने त्यास मान्यता दिली. यानंतर त्याने आरोपी अमोल शिंदे, ललित झा, मनोरंजन डी, सागर शर्मा आणि महेश कुमावत यांच्याशी बोलले, त्यामुळे त्याने पॉलीग्राफ चाचणी (Polygraph test) करण्यास होकार दिला.
दिल्ली पोलिसांनी मागितली वाढीव कोठडी
दरम्यान, मोबाइल डेटा जप्त करण्यासाठी आणि तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कोर्टाकडे आठ दिवसांची पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. अधिवक्ता अमित शुक्ला यांनी पोलीस कोठडीला विरोध केला आणि सांगितले की, न्यायालयीन कोठडीदरम्यान डेटाशी संबंधित चौकशी केली जाऊ शकते आणि न्यायालयीन कोठडीदरम्यान पॉलीग्राफ चाचणीदेखील (Polygraph test) केली जाऊ शकते.
(हेही वाचा – Veer Savarkar : क्रांतिकारकांचा खरा इतिहास पुढे आणण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रयत्नशील – असिलता सावरकर)
यावर एसपीपी म्हणाले की, यूएपीए एजन्सीला 30 दिवसांची पोलिस कोठडी ठेवण्याचा अधिकार देते. एसपीपीने न्यायालयाला सांगितले की ते सोमवारपर्यंत फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (Forensic Science Laboratory) कडून मोबाईल फोन डेटादेखील मिळवतील. (Parliament Security Breach)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community