BMC : आपला दवाखाना, मुंबई सुशोभीकरण आणि स्वच्छतेचे ११८ कोटींचे ‘बेस्ट’ संदेश

बेस्ट बसेस आणि बस स्थानकांवर महापालिकेच्यावतीने मुंबई सुशोभीकरण प्रकल्प, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, स्वच्छता संदेश हे २७ डिसेंबर २०२२ ते २६ जुन २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीकरता प्रदर्शित करण्यात आले होते.

1213
BMC School : महापालिका शाळांमधील मुले होणार क्रीडा क्षेत्रात निपुण

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मागील काही महिन्यांपासून बेस्टच्या बसेसवर तसेच बस स्थानकांवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुंबई सुशोभीकरण प्रकल्प आणि स्वच्छता संदेश झळकताना दिसत आहे. परंतु या तिन्ही योजनांची माहिती जनतेला देण्यासाठी बेस्ट बस (BEST buses) आणि स्थानकांवर संदेश प्रदर्शित करण्यासाठी लावलेल्या जाहिरातींवरच तब्बल ११८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा खर्च केवळ सहा महिन्यांच्या कालावधीसाठीच खर्च केला गेला आहे. (BMC)

बेस्ट बसेस आणि बस स्थानकांवर महापालिकेच्यावतीने मुंबई सुशोभीकरण प्रकल्प, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, स्वच्छता संदेश हे २७ डिसेंबर २०२२ ते २६ जुन २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीकरता प्रदर्शित करण्यात आले होते. बेस्ट बसेस (BEST buses) आणि बस स्थानकांवर प्रदर्शित करण्यात आलेल्या या संदर्भातील जाहिराती प्रदर्शित केल्या. या सर्व जाहिरातींसाठी प्रति महिना १९ कोटी ७९ लाख ६८ हजार रुपये एवढे जाहिरात एजन्सी म्हणून नेमलेल्या साईनपोस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने महापालिकेला आकारले. (BMC)

(हेही वाचा – Veer Savarkar : क्रांतिकारकांचा खरा इतिहास पुढे आणण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रयत्नशील – असिलता सावरकर)

त्यामुळे या जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी सहा महिन्यांसाठी ११८.७८ कोटी रुपये अतिरिक्त अनुदान म्हणून महापालिकेने केले आहे. मुंबई महापालिकेने बेस्टला ८०० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले असून आता पर्यंत ७८१ कोटी रुपयांचा निधी महापालिकेने बेस्ट उपक्रमाला अदा करण्यात आला आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.