स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांनी हिंदुस्थानातील हिंदूंना संघटित करण्यासाठी हिंदुत्वाचा विचार मांडला. या विचाराला भौगोलिक, सांस्कृतिक इतिहास आहे. आपण जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये शिकत होतो. तेव्हा आम्हा सर्व भारतीयांना हिंदू असे संबोधित केले जायचे. हिंदू म्हणून सर्वांना एकत्रित करण्याचे काम सगळ्यांनी केले पाहिजे, असे अभिनेता रणदीप हुडा म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी खासदार शेवाळे बोलत होते. या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे हे उपस्थित होते.
जेव्हा मी ‘सावरकर’ हा सिनेमा करायला घेतला, तेव्हा मला काहीही माहिती नव्हती. कारण तोवर मला देशाच्या स्वातंत्र्याचा लढा केवळ दोन ते तीन जणांच्याच नेतृत्वाखाली लढला गेला, हेच माहित होते. माझ्या स्वतःच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात याच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या याच सावरकर सभागृहातून झाली, हा योगायोग आहे, पण त्यावेळी मला वीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या विषयी अधिक माहिती नव्हती. ती माझी चूक नव्हती, कारण मला तेव्हा वीर सावरकर यांच्याविषयी कुणी सांगणारेच नव्हते, असे अभिनेता रणदीप हुडा म्हणाले.
(हेही वाचा – Veer Savarkar : बाईक रॅली आणि विविध कार्यक्रमांसह राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी दिन साजरा )
भगवा रंग फिकट होऊ लागला आहे तो तेजाने उजळून निघावा – मंजिरी मराठे
१९२३ साली वीर सावरकर यांनी हिंदुत्वाचा विचार मांडला. पण आज हिंदू हे ब्राह्मण, कुणबी, मराठा अशा सर्व जातींमध्ये विभागले आहेत. आज सावरकर (Veer Savarkar) यांच्या विचारांचा आपल्याला विसर पडलेला आहे. म्हणून सर्व हिंदू एकसंध व्हावा यासाठी आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आजच्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्याध्यक्ष मंजिरी मराठे म्हणाल्या.
शनिवार, ६ जानेवारी रोजी सकाळी सर्वप्रथम पुण्यातील येरवडा कारागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रेची सुरुवात झाली. हा केवळ सावरकर सन्मान नाही, तर तो हिंदुत्वाच्या पुनरुत्थानाचा जागर आहे. आज काळा आणि हिरवा हा रंग गडद होत आहे आणि भगवा रंग फिकट होऊ लागला आहे. हा भगवा रंग तेजाने उजळून निघावा, जातपात विसरून हिंदू एकसंध व्हावे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे म्हणाल्या. आजच्या दिवशी पुणे ते दादर अशी यात्रा होणार होती, मात्र मुंबईत जमावबंदीचा आदेश होता. नियम फक्त हिंदू पाळतात, आज उरूसही होता, त्यांना नियम नाही, असा धाक हिंदूंनी निर्माण केला पाहिजे, असेही मंजिरी मराठे म्हणाल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community