Bangladesh Election 2024 : बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक; बीएनपीचा निवडणुकीवर बहिष्कार

बांगलादेशमध्ये रविवारी (७ जानेवारी) सार्वत्रिक निवडणूका होत आहे. सकाळी ८ पासून येथे मतदानाला सुरुवात झाली आहे.तीनशे जागांसाठी मतदान होत आहे. त्यामुळे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

264
Bangladesh Election 2024 : शेख हसीना यांचा दणदणीत विजय; पाचव्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार

बांगलादेशमध्ये रविवारी (७ जानेवारी) सार्वत्रिक निवडणूका होत आहे. सकाळी ८ पासून येथे मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी पाच पर्यंत मतदान सुरू राहणार आहे. येथे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्ष (बीएनपी) निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे विद्यमान पंतप्रधान शेख हसीना (shekh Hasina) यांचा सलग चौथ्यांदा विजयी होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलेल जात आहे. तर या निवडणुकीला विरोध म्हणून बीएनपीने शनिवार ( ६ जानेवारी) पासून ४८ तास ‘बंद’ ची हाक दिली आहे. (Bangladesh Election 2024 )

(हेही वाचा : Loksabha election 2024 : राज ठाकरेंच्या १४ संभाव्य शिलेदारांची यादी आली समोर; मात्र स्वबळावर लढणार का?)

बांगलादेशमध्ये तीनशे जागांसाठी मतदान होत आहे. त्यामुळे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या निवडणुकीत २७ राजकीय पक्षांच्या १५०० पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले असून ४३६ अपक्ष रिंगणात आहेत. याचे निकाल ८ जानेवारी रोजी जाहीर होणार आहेत.  यामध्ये जातीय पक्ष हा सर्वात मोठा विरोधी पक्ष असून अन्य छोटे पक्ष अवामी लीगची बी टीम असल्याची टीका करण्यात येत आहे. तर निवडणुकीतील हिंसाचार तिथे नवीन नाही. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्या पुढाकाराने हिंसाचार होत असल्याचा अनुभव आहे. यंदाच्या निवडणुकीत रिंगणात विरोधी नेत्यांना मोठ्या संख्येने तुरुंगात डांबण्यात आले आहे. बांगलादेशात अनेक पक्ष असले तरी टो एकपक्षीय राजवटीकडे चालल्याचे म्हणूनच म्हटले जात आहे. (Bangladesh Election 2024 )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.