आजच्या वृत्तपत्रातून स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (Veer Savarkar) यांच्याविषयी वृत्त देतांना चुकीचा शब्दप्रयोग वापरला गेला आहे.
६ जानेवारी १९२४ ला स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची जन्मठेपेतून काही अंशाने सुटका झाली. राजकारणात भाग न घेणे आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातच रहाणे (स्थानबद्धता) म्हणजे ‘कारागृहातच मात्र उघड्या’ रहाणे या अटींवर सावरकरांची मुक्तता झाली. त्या स्थानबद्धतेतून त्यांना मुक्त केले, तो दिवस १० मे १९३७ !
स्वातंत्र्योत्तर काळातही भारतीय कॉंग्रेस (Congress) शासनाने त्यांना कारागृहात टाकले होते. काही नतद्रष्टांकडून केल्या जाणाऱ्या त्यांच्या अपकीर्तीद्वारे त्यांना मरणोत्तर जन्मठेप सोसावी लागत आहे, ते वेगळेच !
स्वातंत्र्यवीर सावरकरांची अपकीर्ती करणाऱ्या व्यक्तीला ‘सावरकरांनी सोसलेल्या पद्धतीची शिक्षा’ केली जावी. असे ज्या दिवशी लोकसभेत ठरविले जाईल तो सावरकरांचा (Veer Savarkar) खरा मुक्तीदिन ठरेल.
– श्रीकांत ताम्हनकर, पुणे (६.१.२०२४)
हेही पहा –