100th Natya Sammelan : ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि चॅट जीपीटी हे रंगभूमीसाठी पर्याय ठरू शकत नाहीत; परिसंवादात उमटला सुर

100th Natya Sammelan : ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि चॅट जीपीटी हे रंगभूमीसाठी पर्याय ठरू शकत नाहीत; परिसंवादात उमटला सुर

187
100th Natya Sammelan : ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि चॅट जीपीटी हे रंगभूमीसाठी पर्याय ठरू शकत नाहीत; परिसंवादात उमटला सुर
100th Natya Sammelan : ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि चॅट जीपीटी हे रंगभूमीसाठी पर्याय ठरू शकत नाहीत; परिसंवादात उमटला सुर

ऑनलाईन एन्टरटेन्मेंट (Online entertainment) आणि चॅट जीपीटी (Chat GPT) हे रंगभूमीसाठी पर्याय ठरू शकत नाही. रंगभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलीजन्स, Artificial Intelligence- एआय) पेक्षा भावनिक नातेसंबंध (इमोशनल इंटेलीजन्स, Emotional intelligence) महत्त्वाचा असतो. त्यामुळे या तंत्रज्ञानाला घाबरण्यापेक्षा ते तंत्रज्ञान समजून घ्या. AI चे गुलाम होऊ नका, त्याचा फायदा करून घ्यावा. त्याचा आपल्या लेखनासाठी फायदा कसा करून घ्यायचा हे लेखकांनी समजून घ्यावे. त्यामुळे ‘ऑनलाईन एन्टरटेन्मेंट’  (Online entertainment) आणि ”चॅट जीपीटी”चे (Chat GPT) धोके जरी असले, तरी ते समजून घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा, असा सूर रविवार, ७ जानेवारी रोजी शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) आयोजित केलेल्या परिसंवादात उमटला.

(हेही वाचा – ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा’)

ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि ”चॅट जीपीटी” विषयी परिसंवाद

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात रविवारी ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि ”चॅट जीपीटी”चा रंगभूमीवर परिणाम होतोय का?” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता या परिसंवादात अभिनेते सुनील बर्वे, ज्येष्ठ नाटककार विजय केंकरे, लेखक नीरज शिरवईकर सहभागी झाले होते, त्यांच्याशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक अजित भुरे यांनी संवाद साधला. या वेळी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष किरण येवलेकर, तळेगाव शाखेचे सुरेश धोत्रे, जयराज काळे आदि मान्यवर उपस्थित होते.

लेखकाच्या सृजनशीलतेला पर्याय नाही

या परिसंवादात बोलताना नाटककार विजय केंकरे म्हणाले, ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि ”चॅट जीपीटी” मुळे क्षणिक काळाचे नाटककार, लेखक तयार होतील, अशी भीती आहे. कोरोना काळात चॅट जीपीटी किंवा ए. आय. चा उपयोग झाला असला, तरी आता असे लेखक फार काळ टिकणार नाहीत. कारण हे तंत्रज्ञान ढोबळ स्वरूपाचे आहे. लेखकाच्या सृजनशीलतेला पर्याय नाही. शिवाय रंगभूमीवर होणारे प्रयोग हे केवळ नाटककारच करू शकतात चॅट जीपीटी किंवा ए. आय. ते लिहू शकत नाही. असे प्रयोग झाले, तरी ते टिकणार नाहीत. नाटक आणि सिनेमा ही टिकाऊ गोष्ट आहे ही जाणीव लेखकाला असेल तर चॅट जीपीटी किंवा ए. आय. हा धोका होऊ शकत नाही. (100th Natya Sammelan)

(हेही वाचा – Onion Export : इंडोनेशियाने भारताकडे केली ९ लाख मेट्रिक टन कांद्याची मागणी)

इमोशनल इंटीलीजन्सला जास्त महत्त्व

सुनील बर्वे म्हणाले, कोरोना काळात आम्ही कलाकारांनी मिळून ऑनलाईन ड्रामा कॉम्पिटिशन सुरू केली होती. कलाकार निराशेच्या गर्तेत जाऊ नये, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी ही स्पर्धा आम्ही घेतली होती. पण कोरोना नंतर प्रेक्षक नाट्यगृहात परत आले. ऑनलाईन हे माध्यम मर्यादित आहे. रंगभूमीवर आर्टिफिशियल इंटीलीजन्स पेक्षा इमोशनल इंटीलीजन्सला जास्त महत्त्व आहे.

लेखक नीरज शिरवईकर म्हणाले, चॅट जीपीटी किंवा ए.आय.चा वापर मी केलेला आहे. ते एक साचेबद्ध माध्यम आहे. त्यात कोणत्याही प्रकारच्या भावना नसतात. त्यामुळे चांगल्या लेखकांनी याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घ्यावा. हे तंत्रज्ञान कसं वापरायचं हे कळालं तर लेखकांना यांची मदतच होईल. (100th Natya Sammelan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.