पिंपरी चिंचवड येथील शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा (100th Natya Sammelan) कार्यक्रम आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मुंबईच्या दिशेने जात असतांना अचानक खालापूर टोलनाक्यावर (Khalapur Toll) उतरले.
(हेही वाचा – Coastal Road : मुंबई – वरळी कोस्टल रोडवर टोल नाही; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा)
अँम्बुलन्सला दिला रस्ता
टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या थांबल्या होत्या. ट्रॅफीक जाम होऊन पाच किलोमीटरची रांग लागली होती. लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोलनाक्यावर गेले. या वेळी त्यांनी ट्रॅफीकमध्ये अडकलेल्या अँम्बुलन्सला (Ambulance) रस्ता करून दिला.
या वेळी राज ठाकरे यांनी टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांना खडसावले. राज ठाकरे यांनी तासनतास अडकलेले ट्रॅफीक मार्गी लागले.
(हेही वाचा – Maldives Minister Suspend: पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल मालदीवचे मंत्री निलंबित)
टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांची तारांबळ
मनसेने याआधी टोलविरोधात राज्यभर खळ्ळखट्याक आंदोलने केली आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे स्वतःच रस्त्यावर उतरल्याने टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. ट्रॅफिक जाम पाहून राज ठाकरे यांनी स्वत: हातात सूत्रे हातात घेतली आणि गाड्या सोडून दिल्या. त्यामुळे अडकलेल्या अँम्बुलन्सचा रस्ता मोकळा झाला.
तब्बल 5 किलोमीटर झालेल्या वाहतुक कोंडीमुळे (Traffic congestion) राज ठाकरे संतापले होते. त्या वेळी राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांना तंबी देखील दिली. ‘परत बांबू लावला, तर सगळ्यांना बांबू लावेल’, असे म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्थानिक कॉन्ट्रॅक्टरला दम भरला.
(हेही वाचा – Maratha Reservation : कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही; अजित पवारांचा जरांगेंना इशारा)
निर्लज्ज कॉन्ट्रॅक्टरला अँब्युलन्स दिसली नाही – अविनाश अभ्यांकर
“टोलनाक्यावर निर्लज्ज कॉन्ट्रॅक्टर (Khalapur Toll) टोल घेण्यात व्यस्थ होते. मात्र, तिथेच अँब्युलन्स उभी होती, हे त्यांना दिसलं नाही. राज ठाकरे यांनी स्वत: चालत पुढं गेले अन् गाड्या सोडल्या. महाराष्ट्र सैनिक जर स्वत: रोडवर उतरला, तर एक रुपया सुद्धा टोल घेतला जाणार नाही. तुम्ही पैसे कमवण्यासाठी नाही. सरकारवर महाराष्ट्राच्या जनतेची जबाबदारी आहे”, अशी प्रतिक्रिया मनसे (MNS) नेते अविनाश अभ्यांकर यांनी या वेळी दिली. (Raj Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community