- ऋजुता लुकतुके
रविवार (७ जानेवारी) संध्याकाळ भारत आणि मालदीव्ज या एरवी मित्र देश असलेल्या दोन देशांमध्ये वेगळीच राजनयिक समस्या घेऊन उगवली. मालदीव्जच्या एका मंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा उल्लेख इस्त्रायलचे दूत असा केल्याची बातमी सगळीकडे पसरली. मालदीव्जच्या आणखी दोन मंत्र्यांनीही त्याला जोडून भारताविरुद्ध हिंदूविरोधी टिपण्णी केली. आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत सोशल मीडियावरील वातावरण चांगलंच तापलं.
भारतात बॉयकॉट मालदीव्ज (Boycott Maldives) हा ट्रेंड जोर धरू लागला. आणि अनेक भारतीयांनी सोशल मीडियावर आपण आपली मालदीव्ज सहल रद्द केल्याचे संदेश टाकायलाही सुरुवात झाली. राजनयिक पातळीवर तर दोन्ही देशांमध्ये बोलणी सुरू झालीच, शिवाय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनीही मालदीव्जला जाण्याऐवजी भारतातील लक्षद्वीप सारख्या किनारपट्टीवर फिरायला जा अशी हाकाटी सुरू केली. योगायोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Prime Minister Narendra Modi) सध्या लक्षद्वीप इथंच सुटीवर आहेत. आणि त्यांचे फोटोही व्हायरल होतायत.
(हेही वाचा – Narayan Rane : कोकणात यायचं, मासे खायचं आणि जायचं एवढंच काम त्यांनी केलं ; नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका)
एकाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं की, ‘मी फेब्रुवारीत मालदीव्ज सहलीला जाणार होतो. पण, आता ते मी रद्द करणार आहे. भारतातील कुठल्यातरी किनाऱ्यावर जाईन. जो देश माझ्या देशाचा अपमान करतो, तिथे मला जायचं नाही.’
Was planning to go to Maldives for my birthday which falls on 2nd of feb. Had almost finalised the deal with my travel agent (adding proofs below👇)
But immediately cancelled it after seeing this tweet of deputy minister of Maldives. #boycottmaldives pic.twitter.com/hd2R534bjY— Dr. Falak Joshipura (@fa_luck7) January 6, 2024
Sorry Maldives,
I have my own Lakshadweep.
I am Aatmanirbhar
🔥🇮🇳❤️ pic.twitter.com/kYcvnlLCrF
— Akshit Singh 🇮🇳 (@IndianSinghh) January 6, 2024
आणखी एकाने आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, ‘मी काही महिन्यांपूर्वी तिथे गेलो होतो. आता माझ्या भाचीला मी तिथलं हनीमून पॅकेज बुक करून दिलं. ते मी आता रद्द करतोय. माझे ५०,००० रुपये फुकट गेले तरी चालेल.’
यातील अनेक ट्विट्समध्ये मालदीव्जच्या बुकिंगचे फोटोही टाकण्यात आले आहेत. आणि बॉयकॉट मालदीव्जच्या (Boycott Maldives) बरोबरीने कॅन्सल्ड तसंच एक्प्लोअर इंडियन बीचेस असे ट्रेंडही फिरू लागले.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे होणार थेट प्रक्षेपण)
त्यानंतर मालदीव्जच्या सरकारने वादग्रस्त प्रतिक्रिया देणाऱ्या तीनही मंत्र्यांचा राजीनामा घेतला आहे. पण, भारतीयांनी रविवारच्या दिवशी नेमकी किती बुकिंग रद्द केली याची अधिकृत आकडेवारी सध्या तरी समजू शकलेली नाही.
पण, इझमायट्रिप या ऑनलाईन तिकीट बुकिंग कंपनीने मालदीव्जची पॅकेजेस बंद केली आहेत. कंपनीचे कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांनी सध्या मालदीव तिकिटं आणि पॅकेज रद्द करत असल्याचं म्हटलंय. तर ऑनलाईन बुकिंगचा अंदाज घेतल्यास ८,००० च्या वर हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आली आहेत. तर २,५०० विमानाची तिकिटंही रद्द झाली आहेत. मालदीव्जला येणाऱ्या पर्यटकांमध्ये २०२३ साली भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक म्हणजे २,०९,८३१ इतकी होती. आणि बॉयकॉट मालदीव्ज ट्रेंडचा परिणाम भारतात आणखी ७-८ दिवस राहील असं बोललं जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community